वारसाला मिळकत विक्रीचा वा गहाण ठेवण्याचा अधिकार नसतो.

1
1748
वारसाचे अधिकार

संस्थेच्या प्रत्येक सदस्यानेवारस नोंद  करणे गरजेचे असते। वारसनोंद केली असल्यास अथवा केली नसल्यास काय प्रक्रिया अवलंबावी याची माहिती पुढीलप्रमाणे आहे। वारसाचे अधिकार आणि हक्क समजून घेणे गरजेचे असते

वारसनोंद केली गेली असल्यास
• उपविधी क्र.३२ व ३३ अनुसार सभासद विहित केलेल्या नमुन्यात संस्थेकडे नामनिर्देशन करण्याबाबत अर्ज करावा.
• वारसनोंद अर्ज मिळाल्यावर त्याची पोहोच संस्थेच्या सचिवांकडून अवश्य घेणे व ती सचिवाने देणे बंधनकारक आहे.
• वारसनोंद नाकारण्याचे संस्थेला अधिकार नाहीत.
• संस्थेची पोहोच म्हणजेच वारसनोंद स्वीकृतीचा पुरावा आहे. असे म्हणू शकता.
• पहिल्या वारसनोंद अर्जासाठी कोणतीही फी आकाररली जात नाही. परंतु त्यानंतर केलेल्या प्रत्येक वारसनोंदसाठी रु.५०/- एवढी फी संस्था आकारली जाते.
• वारसनोंद अर्ज आल्यावर व्यवस्थापक समिती सभेत नोंद घेऊन सचिवांनी सात दिवसांच्या आत नॉमिनेशनाची नोंदवहीत नोंद घेणे बंधनकारक आहे.
• सहकार कायद्यातील कलम ३० व उपविधी क्र.३४, १७ (ए) किंवा १९ अनुसार सभासदांच्या मृत्युनंतर नामनिर्देशित व्यक्ती संस्थेकडे सभासदत्व हस्तांतरण अर्ज करून सभासदत्व मिळवू शकते. संस्थेने नामनिर्देशित व्यक्तीच्या नावाने सभासदत्व हस्तांतरण करणे बंधनकारक आहे.
• एकापेक्षा अधिक व्यक्तीच्या नावे नामनिर्देशन केलेले असल्यास नामनिर्देशित सर्व व्यक्तींनी संयुक्त अर्ज सभासदत्व हस्तांतरणासाठी करणे आवश्यक आहे. त्यांच्यापैकी कोणाला सभासदत्व व कोणाला सहसभासदत्व दयावे हे अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सदर व्यक्तींनी संस्थेकडे सदनिकाच्या संदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या दाव्याबाबतची जबाबदारी घेत असल्याबाबतचे बंधपत्र करून देणे बंधनकारक आहे.
• नामनिर्देशन केलेल्या व्यक्तींच्या नावे हस्तांतरण झालेले सभासदत्व म्हणजे पूर्ण मालकी हक्काचे हस्तांतरण झाले नव्हे. प्लॉटधारकांच्या संस्थेस नॉमिनेशन हे फक्त सभासदत्वापुरतेच मर्यादित राहील. भाडेपट्टाकरार करण्यासाठी राहणार नाही. कायदेशीर वारसा हक्काने इतर व्यक्तींसक्षम यंत्रणेसमोर त्यांचे दावे नेऊन मालमत्तेतील मालकी हक्क किंवा भाडेपट्टा करारातील हक्क प्राप्त करून घेऊ शकतात. तसा आदेश सक्षम यंत्रणेकडून प्राप्त करून घेऊन संस्थेस देण्याविषयी संस्था त्यांना कळवू शकते.
वारसनोंद केली गेली नसल्यास कार्यपद्धती
• उपविधी क्र.३५ नुसार नामनिर्देशन न करता सभासदाचा मृत्यू झाल्यास मृत्यू झाल्याचे संस्थेला माहित झाल्यानंतर एक महिन्यांच्या आत संस्थेच्या सूचना फलकावर व किमान दोन स्थानिक वृत्तपत्रात संस्थेने नोटीस लावून त्याद्वारे मृत सभासदाचे मालमत्तेबाबत हक्क दावे, आक्षेप संस्थेने मागवून घ्यावेत.
• नोटिशीनंतर मिळाल्यानंतर झालेल्या दाव्यांचा विचार करून व्यवस्थापक समितीने उपविधी क्र.१७-ए व १९ नुसार मृत सभासदांच्या वैधानिक प्रतिनिधीची निवड करून त्यांच्याकडून इंडेम्निटी बाँड, सभासदत्वाचा अर्ज घेऊन त्या व्यक्तीस सभासदत्व देण्याचा निर्णय घेता येईल.
• एकापेक्षा अधिक व्यक्तींनी संस्थेला संयुक्त अर्ज दयावा. अर्जात नमूद केल्यानुसार संस्थेने पहिल्या व्यक्तीस सभासदत्व व इतरांना सहसभासदत्व देण्यात येते.
• या सभासदत्व हस्तांतरणामुळे वारसदार मालक होऊ शकणार नाहीत ते विश्वस्त म्हणून असतात. तसेच मालकीहक्कांसाठी सक्षम न्यायालयाकडून वारसाहक्क प्रमाणपत्र आवश्यक असेल याबाबत त्यांना संस्थेचे अवगत केले पाहिजे

Recommended this blog also : मृत्युपत्र मनशांतीसाठी करावे.

अधिक माहितीसाठी संपर्क
युवराज (दादासाहेब) पवार
अध्यक्ष,
महा फ्लॅट बायर्स असोसीएशन, पुणे
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसीएशन, पुणे शाखा.
९८९०७१२२१७

Read more about Society Bye-laws:

1 COMMENT

  1. सोसायटी जुनी झाली असेल तर re development ला देऊ शकतो का, त्याबाबत काही निमय आहेत का,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here