जमीन खरेदी करताना घ्यायची काळजी! 

1
1255
Precautions when you buy land/ जमीन खरेदी करताना घ्यायची काळजी

Read in English

जमीन (Property) खरेदी करताना घ्यायची काळजी!

वाचकहो! शेतजमिनींच्या खरेदी-विक्रीमध्ये(Deals) मोठ्याप्रमाणावर फसवणूक होत असल्याची उदाहरणे आपण अनेकदा पाहतो. कोर्टकचेरी, आर्थिक फसवणूक, वादावादी टाळायची असेल तर शेत जमिनीची खरेदी-विक्री करण्यापूर्वी खालीलबाबींची दक्षता घ्यावी.

  •  खरेदी करावयाच्या जमिनीचा चालू सातबारा पहा. जमीन मालकाचे नाव, पीक पाणी नोंदीत खुद्द असा शेरा आहे का?

हा लेख तुम्हाला उपयोगी ठरेल : सातबारा नावावर लावताना

  •  जमीन भोगवटादार वर्ग एक आहे की दोन, देवस्थान इनाम आहे की महार वतन, कुळाची जमीन आहे का याची खात्री करावी. भोगवटादार वर्ग-२ म्हणजे नवीन अटी व शर्तीची जमीन असते. त्यामुळेत्या अटी व शर्ती काय आहेत ते पहावे.
  •  जमिनीचा तीस वर्षांपूर्वीचे सात-बारा काढा. जमीन मालकांच्या  नावावर कशी झाली याची पडताळणी करावी.
  •  जमीन विकणाऱ्याला बहिणी असल्यास बहिणींचे म्हणणे जाणून घ्यावे.
  •  जमीन वारसा हक्काने आली की स्वकष्टार्जित आहे हे पहावे.
  •  सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कात कूळ अगर अन्य व्यक्तींचे आहे का नाही याची खातरजमा करावी. कूळ कायद्याची जमीन असल्यास जमीन मिळून दहा वर्षे झाली असेल तर नजराणा भरून खरेदीची परवानगी प्रांताधिकाऱ्याकडून घ्यावी. दहा वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर कलम ४३ नुसार आवश्यक कार्यवाही करून परवानगी घ्यावी. आधी खरेदी व नंतर परवानगी असा व्यवहार केल्यास तो रद्द होतो.

  •  जमीन मालकाच्या ७/१२ वरील क्षेत्र व प्रत्यक्षात ताब्यात, वहिवाटीत असलेले क्षेत्र तपासा.
  •  शेत जमिनीत जाण्याचा रस्ता, पाणी पुरवठ्याचे साधन, शेततळे, विहिर, बोअरवेल, झाडे, शेतघर आदी जमिनीत असल्यास त्याचा उल्लेख खरेदीखतात आवश्य करावा.
  •  जमिनीवर कुणाचा बोजा आहे का पहा.

हा लेख अवश्य वाचा : मोफा अंतर्गत बिल्डर विरोधात गुन्हे नोंदवा

  •  जमीन पुनर्वसनासाठी राखीव आहे का? लाभ क्षेत्रात आहे का? ते पहावे.
  •  जमिनीची गटवारी झाली असल्यास गटवारीचा उतारा काढून गटवारीपूर्वीचे व गटवारीनंतर झालेल्या क्षेत्रातील बदल तपासून पहावा.
  •  जमिनीत जाण्यासाठी रस्ता आहे की बांधावरून रस्ता आहे याची खातरजमा करावी.
  •  जमीन बागायती आहे की जिरायती यावरून तिचा भाव ठरत असतो.  रेडीरेकनरप्रमाणे जमिनीची किंमत व त्यानुसार स्टँप रक्कम भरावी लागेल पाहावे.
  •  जमिनीबाबत कोर्टकचेरी सुरू नाही ना याची खात्री करावी.
  •  जमीन व्यवहारामुळे पुनर्वसन, तुकडेबंदी, नागरी कमाल जमीन धारणा कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  •  जमिनीच्या ७/१२ वर खासगी वन, राखीव वन असा शेरा असल्यास खरेदी करू नयेत.
  •  जमीन व्यवहार ठरल्यास देय रक्कम बँकेमार्फत द्यावी. त्याचा उल्लेख खरेदीखतात करावा.
  •  व्यवहार करताना तज्ज्ञांच्या माध्यमातून करावा.
  •  जमीन मोजणीचा नकाशा पाहून जमिनीचा आकार पहावा.
  •  चतु:सीमा नुसार संबंधित गावचा नकाशा असल्याची खात्री करावी.
  •  जमीन मालकाने कर भरल्याची खात्री करावी.
  •  व्यवहार हा बेनामी पद्धतीने करू नये तसेच जमिनीचा व्यवहार हा थेट मालकाशी करावा.
  •  मध्यस्थामार्फत व्यवहार करताना त्याला द्यावयाच्या कमिशनची बोलणी आधीच करावी.

  •  कुलमुखत्यारपत्राच्या आधारे व्यवहार करताना संबंधित व्यक्तीने त्यास ते दिले असल्याची खात्री करावी. तसेच कुलमुखत्यारपत्र करून देणारी व्यक्ती अस्तित्वात आहे का हे पहावे शक्यतो नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र असेल तरच व्यवहार करावा.

हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरेल : जमीन बिल्डरला विकसनासाठी देताना!

  •  जमिनीचा झोन कुठला आहे ते पहावे उदा. रहिवासी, शेती, शेती ना विकास, औद्योगिक आदी.
  •  रजिस्टर पद्धतीनेच जमिनीचा व्यवहार करावा. अर्धवट व्यवहार करू नये.
  •  नवीन शर्तीची जमीन घेताना आवश्यक त्या सर्व अटींची पूर्तता झाली आहे का नाही हे पहावे. नवीन शर्तीची जमीन संबंधिताची परवानगी घेतल्याशिवाय खरेदी करू नये.
  •  खरेदी व्यवहार झाल्यानंतर खरेदी खताची मूळ प्रत व इंडेक्स टू (सूची क्रमांक-दोन) ताब्यात घ्यावा.
  •  खरेदी खत झाल्यावर तात्काळ सातबारावर नाव लावून घ्यावे.

जमीन खरेदी करा! प्रगती करा!

#WeRunsocieties

1. Website –     https://www.dearsociety.in/
2. Instagram –  https://instagram.com/dearsocietymh?igshid=NmE0MzVhZDY=
3. LinkedIn –    https://www.linkedin.com/company/dear-societyin/
4. Facebook –   https://www.facebook.com/dearsocietyMH?mibextid=ZbWKwL

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here