डेव्हलपमेन्ट अग्रीमेंट करताना…

4
1728
Joint Develoment Agreement
जमीनमालक बिल्डरला विकसनासाठी जमीन देण्याबाबत जी घाई करतात ती, कालांतराने अंगलट येते. त्याची परिणीती न्यायालयीन वादात होते. राज्यात जमिनी विकसित करून मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. अनेकदा बिल्डर जमिनी विकसनासाठी घेऊनच बांधकाम करत असतात, अशावेळी जमीनमालकाने बिल्डरला जमीन विकसनासाठी देताना काय माहिती आणि काळजी घेतली पाहिजे याबाबत जागृती करणारा लेख प्रत्येक जमीन मालकांना वाचलाच पाहिजे.
जमीन मालकांनो हि माहिती तयार ठेवा.

१) सर्व सातबारा, प्रॉपर्टी कार्ड

२) झोन दाखला

३) जमीन मालक व त्यांचे ओळखीचे पुरावे आणि निर्विवाद संमती असावी.

४) मागील ३० वर्षाचा शोध अहवाल (Search Report)

५) लागू चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) प्रमाण म्हणजेच एकूण जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती बांधकाम अनुज्ञेय आहे.

६) बांधकाम आराखडा मंजूर केल्यास किती सदनिकानां मंजुरी मिळू शकते, किती पार्किंगसाठी मंजुरी मिळू शकते.

७) अँसिलरी एफएसआय, टीडीआर किंवा एफएसआय विकत घेऊन अधिकतम किती बांधकाम केले जाऊ शकते.

८)  मंजूर बांधकाम आराखड्यानुसार सुविधाक्षेत्र आणि अंतर्गत रस्ते राखीव ठेवावे लागणार असल्यास सदर क्षेत्र हे स्थानिक प्राधिकरणास वर्ग करावे लागते, त्याच्या मोबदल्यात जर FSI  मिळणार असल्यास त्याबाबत माहिती.

जमीन विकसनासाठी देण्याची घाई करू नका. त्यात तुमचे कधीच नुकसान होत नाही. उक्त माहिती प्राप्त करून घेतल्यास विकसन करारनामा करताना अधिक चांगल्या प्रकारे मोबदला मिळवता येतो. स्वतःचा तज्ज्ञ वकील नेमून काम करा.

विकसन करारनाम्यात या गोष्टींचा समावेश असावा.

१. जमिनीच्या मोबदल्यात एकूण किती बांधकाम मिळणार

२. जमिनीच्या मोबदल्यात दिले जाणारे रहिवासी व वाणिज्य क्षेत्रफळ

३. सुरक्षा ठेव / अनामत रक्कम

४. बांधकाम मंजुरी करून घेणे, बांधकाम चालू करणे व बांधकाम पूर्ण करण्याबाबत कालावधी व दिनांकांचा स्पष्ट उल्लेख करावा.

५. बांधकामास विलंब झाल्यास नुकसान भरपाईचा स्प्ष्ट उल्लेख

६. प्रकल्पात दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांचा दर्जा, साहित्यांचा दर्जा, साहित्य पुरवठादार कंपन्या, सुविधा आणि साहित्यांची क्षमता आदी गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करू घ्यावा. त्यासाठी अतिरिक्त रक्कम खर्च करावी लागणार असल्यास स्पष्ट उल्लेख करावा.

७. वाढीव FSI वरील अधिकार बिल्डरला बहाल करू नये. शासकीय धोरणात बदल झाल्यास मिळणाऱ्या वाढीव FSI मधील हक्क राखून ठेवावा.

८. मोबदल्यातील सदनिकांचे बांधकाम सर्वात आधी करण्याची अट असावी. बांधकाम आराखडे मंजूर झाले कि तात्काळ मोबदल्याच्या सदनिका नावावर करून घेण्यासाठी घोषणापत्र / हस्तांतरण दस्त करून घेण्याचा उल्लेख असावा.

९. बिल्डरला प्रकल्प इतर विकासकांना हस्तांतरित करायचा असल्यास त्याबाबत परस्पर निर्णय घेण्याचे अधिकार बिल्डरला देऊ नये. जमीन मालकांशी विचारविनिमय करूनच असा निर्णय घेण्याबाबत स्पष्ट उल्लेख करावा.

१०. जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे सदनिकाची विक्री करण्याचे अधिकार बिल्डरला देऊ नये.

११. सर्व आर्थिक व्यवहार बँकेच्या माध्यमातूनच करावे. टॅक्स बचतीच्या बहाण्याने रोखीचे व्यवहार करू नये.

१२. जमीनमालक म्हणून तुम्हाला वेगळ्या इमारती पाहिजे असतील तर वेगळा बांधकाम आराखडा मंजूर करून घेणे उत्तम. भविष्यातील सर्व संभाव्य वाद नष्ट होतात. तशी तरतुद विकसन करारनाम्यात करा.

बिल्डरबाबत खालील माहिती घेऊन मग विकसन करारनामा करावा

१. बिल्डरची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी बिल्डर व कंपनीचे मागील ३ वर्षांचे ताळेबंद पाहावे, पाहुणा, मित्राचा मित्र किंवा अश्या कोणत्याही भावनिक आशा अपेक्षा ठेवणाऱ्याना बळी न पडता, व्यावहारिक निर्णय घ्या. नाही म्हणायचे धाडस ठेवा.

२. यापूर्वी बिल्डरने बांधकाम केलेल्या प्रकल्पाना भेट देऊन तेथील जमीन मालकांशी चर्चा करावी. तसेच तेथील सदनिकाधारकांशी चर्चा करून माहिती घ्यावी. प्रकल्प वेळेत पूर्ण केला का? सुविधा दिल्या का? जमीन मालकांची फसवणूक केली आहे का?  त्यांचे अनुभव जाणून घ्यावे.

३. बिल्डरच्या गोड बोलण्यावर किंवा तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवण्यापेक्षा कागदपत्रांवर अधिक विश्वास ठेवावा.

मंडळी जमिनीचा विकास करताना करोडो रुपयांचे व्यवहार होणार असतात, व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत यासाठी विकसन करारनामा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच विकसन करारनामा करावा. योग्य हातात जमीन विकासासाठी द्या.

#WeRunSocieties

 

Disclaimer: Thank you for visiting our site. The information provided as Dear Society (“we,” “us” or “our”) on https://www.dearsociety.in (the “Site”) is for general informational purposes only. We strive to provide our readers with accurate information that helps them learn more about the topics. It is not intended as a substitute for professional advice. We do not accept responsibility for the accuracy of information sourced from an external entity or take personal/ legal responsibility for your use of this information. Thank you.

 

 

4 COMMENTS

  1. […] Know Everything about Joint Development Agreement. जमीनमालक बिल्डरला विकसनासाठी जमीन देण्याबाबत जी घाई करतात ती, कालांतराने अंगलट येते. त्याची परिणीती न्यायालयीन वादात होते. राज्यात जमिनी विकसित करून मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. अनेकदा बिल्डर जमिनी विकसनासाठी घेऊनच बांधकाम करत असतात, अशावेळी जमीनमालकाने बिल्डरला जमीन विकसनासाठी देताना काय माहिती आणि काळजी घेतली पाहिजे याबाबत जागृती करणारा लेख प्रत्येक जमीन मालकांना वाचलाच पाहिजे. जमीन मालकांनो हि माहिती तयार ठेवा. १) सर्व सातबारा, प्रॉपर्टी कार्ड २) झोन दाखला ३) जमीन मालक व त्यांचे ओळखीचे पुरावे आणि निर्विवाद संमती असावी. ४) मागील ३० वर्षाचा शोध अहवाल (Search Report) ५) लागू चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) प्रमाण म्हणजेच एकूण जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती बांधकाम अनुज्ञेय आहे. ६) बांधकाम आराखडा मंजूर केल्यास किती सदनिकानां मंजुरी मिळू शकते, किती पार्किंगसाठी मंजुरी मिळू शकते. ७) अँसिलरी एफएसआय, टीडीआर किंवा एफएसआय विकत घेऊन अधिकतम किती बांधकाम केले जाऊ शकते. […]

  2. Hey there! I know this is kinda off topic but I was wondering if you knew where I could locate a captcha plugin for my comment form? I’m using the same blog platform as yours and I’m having difficulty finding one? Thanks a lot!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here