सहकारी गृहनिर्माण संस्थेत भाग हस्तांतरण सभासदाच्या मृत्यूने किंवा सदनिका विक्री केल्यास उदभवते. संस्थेत प्रत्येक सभासदाने नामनिर्देशन (नॉमिनेशन) करणे आवश्यक असते. नामनिर्देशन केल्यास सभासदाच्या मृत्यूपश्च्यात उदभवणाऱ्या समस्यांना आला बसण्यास मदत होते. नामनिर्देशनासह सभासदांनी त्यांचे विल (मृत्यूपत्र) करून ठेवणे तितकेच अनिवार्य झाले आहे. नामनिर्देशन केले असल्यास किंवा केले नसल्यास काय करावे हे पुढील २ भागात याबाबत सविस्तर माहिती घेऊ. पहिल्या भागात नामनिर्देश असल्यास भाग हस्तांतरण करताना समितीने काय करावे याबाबत माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
नामनिर्देशनाबाबत नियम
१) सभासदांनी करावयाची नामनिर्देशने संस्थेच्या सभासदाला आणि सहसभासदाला विहित केलेल्या नमुन्यानुसार स्वाक्षरित एका व एकापेक्षा जास्त इसमांच्या नावे नामनिर्देशन करता येते. अर्ज ३ प्रतीत करावा.
२) सभासदाच्या मृत्यूनंतर त्याचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग किंवा हितसंबंध सदर नामनिर्देशित इसमाकडे/इसमांकडे संपूर्णतः वा अंशतः हस्तांतरीत करण्यांत येतात.
३) सचिवांकडून नामनिर्देशन अर्ज मिळाल्याची, (स्वीकारल्याची) पोहोच (पावती) म्हणजेच सदरचे नामनिर्देशन सचिवाने मान्य केल्याचे समजण्यात येते.
४) पहिल्या नामनिर्देशनाच्या नोंदणीसाठी शुल्क आकारले जात नाही.
५) सभासदाला केंव्हाही स्वतःच्या सहीने सभासदास संस्थेच्या सचिवांकडे लेखी अर्ज करून आधीचे नामनिर्देशन रद्द करता येते अथवा त्यात बदल करता येतो. नामनिर्देशनातील केलेल्या बदलाच्या अर्जावर संस्थेच्या सचिवाची पोहोच म्हणजेच सचिवांकडून आधीचे नामनिर्देशन रद्द झाले आहे, असे सजण्यात येते,
६) प्रत्येक नवीन नामनिर्देशनासाठी रुपये १००/- शुल्क आकारता येते.
७) नामनिर्देशनपत्र किंवा पूर्वी केलेले नामनिर्देशन रद्द करण्यासंबंधीचे पत्र आल्यावर संस्थेच्या सचिवाला असे पत्र प्राप्त झाल्याच्या तारखेच्या लगेच/नंतर भरणाऱ्या समितीच्या सभेपुढे इतिवृत्तात नोंद घेण्यासाठी तो अर्ज किंवा ते पत्र ठेवावा लागतो. सभेच्या तारखेपासून ७ दिवसांचे आत नामनिर्दशनाच्या नोंद पुस्तकात दाखल करावी लागते.
८) सभासदाने एकाच व्यक्तीस नामनिर्देशन केले असल्यास सभासदाच्या मृत्यूनंतर संस्थेने भांडवलात/मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध त्या नामनिर्देशित व्यक्तीला हस्तांतरित करावी लागतात.
९) जर मालमत्ता मयत सभासद आणि सहयोगी सभासद यांनी एकत्रितपणे खरेदी केली असेल तर मयत सभासदांचा संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील असलेला भाग व हितसंबंध नामनिर्देशन केलेल्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जातात.
१०) नामनिर्देशित व्यक्तिंनी हस्तांतरण करणेसाठीचा अर्ज सभासदांच्या मृत्यूनंतर सहा महिन्याचे आत दाखल करणे आवश्यक आहे.
११) नामनिर्देशीत व्यक्ती एकापेक्षा अधिक असतील अशा वेळी सर्वांनी एकत्रितपणे एकच संयुक्त अर्ज संस्थेकडे दाखल कारवयांचा असतो. आणि या नामनिर्देशित व्यक्ती पैकी सभासद म्ह्णून कोणाची नोंद करावयाची याचाही खुलासा करणे आवश्यक असते.तर इतर नामनिर्देशीत व्यक्तींची सहसभासद म्हणून नोंद केली जाते. तसेच इतर नामनिर्देशित व्यक्तींनी, मयत सभासदांचे भांडवल/मालमत्तेत असलेले भाग किंवा हितसंबंध यावर केव्हाही हक्क सांगितल्यास त्याची संस्थेस कोणत्याही प्रकारे झळ पोहोचू दिली जाणार नाही याची हमी म्हणून विहित नमुन्यात हमी रक्षण बंधपत्र देणे आवश्यक आहे.
१२) नामनिर्देशनाच्या आधारावर सभासदत्व मिळविले असल्यास असा सदस्य सर्व कायदेशीर वारसाची नोंद होत नाही तोपर्यंत सदनिका/घटक याचा विश्वस्त असतो आणि त्याला मालकी हक्काचे हक्क असत नाहीत आणि काहीही झाले तरी कोणत्याही प्रकारे तिसऱ्या पक्षकारांचे हितसंबंध किंवा अन्य संक्रमण निर्माण करता येत नाही.
पुढील भागात नामनिर्देशन केले नसल्यास, मृत्यपत्र असल्यास काय करावे याबाबत माहिती घेऊ तरी पुढील सोमवारचा पुण्यनगरीचा अंक आरक्षित करून ठेवा.
#WeRunSocieties
[…] नमुना, सभासद यादी, “जे” नमुना, शेअर्स सर्टिफिकेट यांचा आधार घेवून मतदार यादी तयार […]
[…] CERTIFICATE: A society issues certain shares to its members, as per the bylaws and the share certificate becomes an important title deed, since the allotment of the premises are related thereto. This is […]