गृहनिर्माण संस्था निवडणूक नियमांबद्दल
मंडळी नमस्कार! ३ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर 251 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थेची निवडणूक घेता येणार आहेत. या निवडणूक उत्सवाच्या निवडणुक नियमाबाबत सदनिकेत राहणाऱ्या वाचकांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यांच्या साठी निवडणूक नियम सोप्या आणि आपल्या भाषेत समजून घेऊ. नियमांची पार्श्वभूमी समजावण्यात जागा वाया न घालवता सरळ मुद्दा समजून घेऊ.
सर्व प्रथम निवडणूक आयोजित करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती व्यवथापकीय समितीने करायची आहे. निवडणूक अधिकारी हा शासनाच्या नामतालिकेवरील नेमावा किंवा संस्थेतील असा सभासद जो निवडणूक लढण्यास इच्छुक नसेल त्यास नेमावे. समितीने आय व जे नोंदवहीच्या आधारे तात्पुरती मतदार यादी तयार करावी, या मतदार यादीत आडनाव, नाव, वडिलांचे वा पतीचे नाव, वय आणि लिंग या माहितीचा समावेश असावा. त्यानंतर सदर यादी संस्थेचा सचिव अथवा निवडणूक अधिकाऱ्याने संस्थेच्या सूचना फलकावर लावावी. व एक प्रत निबंधक कार्यालयात जमा करावी. आणि तात्पुरत्या मतदार यादीबाबत इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा लेखी सूचनेद्वारे सभासदांचे दावे व आक्षेप मागवावे. ज्या मतदारांना सह सदस्य किंवा सहयोगी सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा आहे, त्यांनी मतदानाच्या अधिकाराबाबत लेखी संमती निवडणूक अधिकाऱ्यास जमा करावी. सभासदांनी जे दावे आणि आक्षेप नोंदवले ते लक्षात घेऊन अंतिम मतदार यादी निवडणूक अधिकारी यांनी तयार करावी. अंतिम मतदार यादी तयार करून मतदार यादी निवडणूक अधिकाऱ्याने संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी, त्यानंतर विविध टप्प्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. निवडणूक अधिकारी मतदारांची अंतिम यादी प्रदर्शित झाल्याच्या 7 दिवसांच्या आत निवडणुकीच्या विविध टप्प्यांचा कार्यक्रम काढतील आणि जाहीर करतील, जे खालीलप्रमाणे असतात,
(अ) निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याची दिनांक
(आ) नामांकन करण्याची शेवटची तारीख.
(इ) प्राप्त झालेल्या नामांकनांची यादी प्रसिद्ध झाल्याची तारीख.
(ई) नामांकन छाननीची तारीख.
(उ) छाननीनंतर वैध नामांकनांची यादी प्रकाशित करण्याची तारीख.
(ऊ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक
(ए) निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करण्याची तारीख आणि निवडणूक चिन्ह वाटप.
(ऐ) विशेष सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ आणि ठिकाण ज्यामध्ये मतदान घेतले जाईल किंवा बिनविरोध निवडणूक जाहीर केली जाईल.
(ओ) मते मोजण्यासाठी तारीख, वेळ आणि ठिकाण.
(औ) निकाल
सदर निवडणूक कार्यक्रम ३८-४० दिवस चालतो. निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम प्रकाशन करायचे असते. निवडणूक अधिकाऱ्याने सोसायटीच्या नोटीस बोर्डावर निवडणूक कार्यक्रम प्रकाशित करायचा असतो, आणि सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक किंवा हँड डिलीव्हरीद्वारे किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे किंवा कुरियरद्वारे विशेष महासभेच्या तारखेसह, तारखेसह प्रसारित करावा अशी तरतूद आहे. या निवडणुकीत उमेदवार अनामत ठेव म्हणून खुल्या व मागास वर्गासाठी रुपये ५००/- आणि अनुसूचित जाती जमातीसाठी रुपये २५०/- जमा करावे लागणार आहे. तसेच चिन्ह वाटपाबाबत नियम स्पष्ट केले गेले आहेत. अनेक उमेदवारांनी एकाच चिन्हाची मागणी केल्यास “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” यानुसार वाटप करायचे असते, 30 टक्के पेक्षा अधिक उमेदवारांनी एकाच चिन्हाची मागणी केल्यास एकच चिन्ह देता येते. मागणी अर्जा वर सर्व उमेदवारांच्या सह्या असणे आवश्यक आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचे यादीतील चिन्हांचे वाटप करणे बंधनकारक आहे.
निकालानंतर किमान सात दिवस अगोदर नोटीस देऊन निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडून आलेल्या उमेदवारांची प्रथम सभा घेऊन त्यांचे इतिवृत्त लिहून त्याची प्रत निबंधकास सादर करतील. सदर सभेच्या नोटिशीमध्ये एकूण निवडावयाचे पदाधिकारी तसेच सभेचा दिनांक, ठिकाण व वेळ यांचा समावेश असतो.
निवडणुकांशी संबंधित कागदपत्रांचा ताबा निवडणूक निर्णय अधिकारी हे संस्थेचे सचिव अथवा प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे निवडणुकीचे सर्व कागदपत्र दप्तर नोंदी सुपूर्द करतील. हे रेकॉर्ड संस्थेने सहा महिने सुरक्षित ठेवायचे असते, सहा महिन्यांनी नष्ट करावे. . मात्र निकालाबाबत विवाद असल्यास विवाद संपेपर्यंत सदर दप्तर जपून ठेवणे आवश्यक आहे.
समितीची निवड झाल्यावर निवडणूक अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांची बैठक एका निश्चित तारखेला बोलावतील आणि त्याची सूचना समितीच्या प्रत्येक सदस्याला निश्चित तारखेच्या किमान सात दिवस आधी लिखित स्वरूपात पावतीसह दिली जाईल. पहिल्या समितीच्या सभेत संस्थेचा अध्यक्ष सचिव आणि खजिनदाराची नेमणूक केली जाईल.
७ सप्टेंबर २००२ नंतर जमीनलेल्या मुलांमुळे अपत्य संख्या ३ झाल्यास संबंधित व्यक्तीला निवडणुक लढवता येत नाही. तसेच सहकार कायद्याच्या कोणताही कलमान्वये कासूरवर ठरवलेल्या किंवा १ वर्षापेक्षा अधिक कालावधीची कारावासाची शिक्षा झालेल्या व्यक्तीस निवडणूक लढवता येत नाही.
तेंव्हा वाचकहो, नियमानुसार निवडणुक घेऊन पदभार स्वीकारा, बेकायदेशीर पदभार स्वीकारल्यास फौजदारी कारवाईस पात्र व्हाल. काळजी घ्या.
Whether permission is required from Registrar to Returning Officer to call for meeting of newly elected Committee Members to elect President, Secretary and Treasure.
We are happy to answer your question.
we will reach you soon or you can also contact us on 9175733957
30 सदस्य असलेल्या सोसायटी ची निवडणूक पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे AGM मधून आवाजी मतदानाने करू शकतो का
आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957
जर सभासदांचा मृत्यू झाला असेल आणि त्याने बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि कर्जाच्या बदल्यात त्याच्या फ्लॅटवर बँकेचा दावा असेल तर त्याच्या मागे कोणीही नॉमिनी उरला नाही तर बँकेकडून फ्लॅटचा लिलाव होईपर्यंत सोसायटी मेन्टेनन्स कोण देईल?
कृपया तुमचा सल्ला द्या
NAVIN KAHI MAHITI ASEL TAR DYAVI
गृहनिर्माण संस्था निवडणूक काळात व्हॉट्स ॲपवर किंवा व्यक्तिशः, निवडणुक पूर्व किती काळ प्रचार करु शकतो.
आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957
नमस्कार
निवडून आलेल्या सदस्याची प्रथम सभा निवडणुक अधिका-याने निवडणूक निकालानंतर किती दिवसानी बंधणकारक आहे? कृपया माहिती मिळावी.
आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957
पजेशन मिळण्यापुर्वी सोसायटी स्थापन झाली आणि 13 लोकांची फ्लोअर वाईज बॉडी मेंबर झाले पण आजपर्यँत बिल्डर सोबत ज्या काही मीटिंग होतात त्या फक्त चेरमन, सचिव, खजिनदार यांच्या बरोबर आणि अश्यावेळी बॉडी मेंबर ला मीटिंगला allow केल जात नाही तर कायदा कांय सांगतो.तसेच एखाद्या वेळी या तिघा पैकी कोणीही बिल्डर बरोबर मीटिंगला हजर नसेल तर या बॉडी मधील इतर सदस्य ला allow केल जात नाही.
थोडं सविस्तर माहिती द्या
आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957
Does a society with just 11 members need to go for elections or they can just nominate office bearers by consensus?
वडिलांनी लिहुन ठेवले नोंदनिकृत दस्त ने नियमाप्रमाणे संचालक मंडळ चा ठराव होवून माझ्या नावं सोसायटीच्या चे कागदपत्रे झाले आहे. पैसे भरून घेतले आहेत कबजेपट्टी शेअर्स सर्टिफिकेट ही चेअरमन यांनी दिले आहे पण चेअरमन व संचालक मंडळ याचेत वाद निर्माण झाला ने संचालक मंडळ ने राजीनामा दिला. वार्षिक मिटिंग झाली नाही. तद नंतर प्रशासक आले तेनी वार्षिक मिटिंग घेतली आणि नविन सभासदांना मंजुरी विषय होता पण मृत्यूपत्र हे प्रकरण न्यायालयात आहे म्हणून माझे नांव पेंडिग ठेवलं आहे . न्यायालयाने कोणत्याही आदेश दिलेला नाही.
मार्गदर्शन करावे हि विनंती
आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957
How many clear days notice period is required for conducting Election Process ? This notice to be given by RO or previous committee??
Please advice
We are happy to answer your question.
we will reach you soon or you can contact us on 9175733957
How to conduct society election
1. Candidaet elegible
2. deposit amt.
3. Cast of candidate
4.persentage of reservation
5.How to fill Nomination form
6. Any witness to candidate for fill the form
थकबाकीदार सभासदास कमिटीच्या निवसणुकीत नामनिएदेशन करता येते काय, मतदानाचा अधिकार असतो का?
Mobile number-8097639649
We are happy to answer your question.
we will reach you soon or you can also contact us on 9175733957
चाळीमध्ये सोसायटी बनवता येते का
उमेदवारी साठी किती अपत्ये असली पाहिजे दोन पेक्षा जास्त असतील तर उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येते का सर
भाडेतत्त्वावर सदनीका दीलेले सदस्य निवडणूक लडवु शकतात का?
सोसायटीचा सभासद जर सरकारी कर्मचारी असल्यास सोसायटीचा सहयोगी सदस्य म्हणून निवडणुकीला उभा राहू शकतो का
तुम्ही कार्यरत असलेल्या विभागाची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क करा ९१७५७३३९५७
सोसायटी नोदणी झालानंतर निवडणूक न घेता पदाधईकरी नेमले गेले तर अशी सोसायटीला कायदेशीर होता का?आणि त्यांनी घेतलेले निर्णय सभासदांना बंधेंकारक असतात का?
कायदेशीर सल्ला व माहितीसाठी संपर्क करा – ९१७५७३३९५७
गृहनिर्माण सोसायटीत संचालक मंडळ मनमानी करत असेल तर काय करावे
कायदेशीर सल्ला व माहितीसाठी संपर्क करा – ९१७५७३३९५७.
ई वर्गातील गृनिर्मान निर्माण सरकारी संस्थेचे पदाधिकारी यांची जर वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनाच्या नियमाप्रमाणे वर्गीकरणा नुसार सभेत ठराव घेऊन सर्वांच्या अनुमाते तसा ठराव व यादी निबंधकास सादर करता येतेक किंवा ती ग्राह्य मानली जाईल का कृपया मार्गदर्शन
कायदेशीर सल्ला व माहितीसाठी संपर्क करा – ९१७५७३३९५७.
उमेदवारी अर्ज छानणीवेळी एखाद्या उमेदवारास तीन अपत्य आहेत हा लेखी आक्षेप घेतला असतानाही निवडणुक निर्णय अधिकारी कागदोपत्री पुरावा मागणे योग्य आहे का?
निवडणुक निर्णय अधिकारी उमेदवारास किंवा प्रतिनिधीस छानणीचे वेळेसच तीन अपत्य आहेत का नाही हे विचारून निर्णय घेऊ शकतो कि नाही.का पुरावा देणेच गरजेच आहे
कायदेशीर सल्ला व माहितीसाठी संपर्क करा – ९१७५७३३९५७.
गृहनिर्माण संस्था समिती निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संस्थेतील एकूण सभासद संख्या विचारात घेऊन पात्र मतदारांची यादी, थकबाकीसह अपात्र मतदारांची यादी प्रारूप व अंतिम यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार निवडणुकीच्या दिवशी थकबाकीदार (अपात्र) सभासदांना देखील मतदानाचा अधिकार दिला. याबद्दल सविस्तर माहिती व नियम देणे विनंती
सविस्तर चर्चा आवश्यक आहे. तुमच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन मीटिंग सुद्धा शेड्यूल केली जाऊ शकते. appointment साठी संपर्क 9175733957, धन्यवाद!