म्हाडा गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतरण 

0
856
तपासणी सूचीतील आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर त्या समोर स्वीकृती लिपिकाने ( ) अशी खूण करावी.

१. विहीत नमुन्यातील अर्ज

२. संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत

३. म्हाडाने अभिहस्तांतरणासाठी विहित केलेला संस्थेने करावयाचा ठरावाचा नमुना (संस्थेच्या लेटरहेडवर व मूळ प्रतीत)

४. म्हाडाने विहित केलेले अर्जदाराचे रू. २००/- चे स्टॅम्प पेपरवरील क्षतीपूर्तीबंध

५. प्रत्येक सदनिकेची अंतिम विक्री किंमत भरल्याची पावती

६. प्रत्येक सदनिकेची ३० वर्षांचे भुईभाडे, नाममात्र भुईभाडे व आजअखेरचा अकृषिक आकार भरल्याच्या पावत्या

७. प्रत्येक सदनिकेचे वितरण पत्रावरल मुद्रांक शुल्क तसेच हस्तांतरण झाले असल्यास सर्व बदलांवरील मुद्रांक शुल्क भरलेल्या पावत्यांच्या प्रती

८. अतिरिक्त चटई क्षेत्र असल्यास अधिमूल्य रक्कम भरणा केलेल्या पावतीची प्रत

सदनिका / भूखंडधारकाने / नी सदनिका / भूखंड वित्तीय संस्थेकडे तारण ठेवून कर्ज घेतले असल्यास संस्थेच्या नावे अभिहस्तांतरण करणेसाठी वित्तीय संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र

१. अभिहस्तांतरण हे संस्थेच्या नावाने करावयाचे असते म्हणून म्हाडाचे मूळगाळेधारक आणि म्हाडाकडून रितसर परवानगी घेतेलेले गाळेधारक यांच्या यादीनुसार संस्थेबरोबर अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. तथापि, ज्या गाळेधारकांनी अद्यापही हस्तांतरणास रितसर परवानगी घेतलेली नाही त्यांच्या बाबतीत मूळ गाळेधारकाच्या नावांच्या यादीनुसार संस्थेबरोबर अभिहस्तांतरण करण्यात यावे व संबंधित गृहनिर्माण संस्थेकडून सदरच्या गाळेधारकांचे हस्तांतरणास अभिहस्तांतरण झाल्यानंतर विहित कार्यपध्दतीनुसार कागदपत्रांची पूर्तता व हस्तांतरण शुल्क भरून म्हाडाकडून परवानगी घेण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन संबंधित गृहनिर्माण संस्थेचे अभिहस्तांतरण करण्यांत यावे.

२. गाळेधारकाने केलेले वाढीव बांधकाम अनधिकृत बांधकाम अभिहस्तांतरण प्रक्रियेच्या बाबतीत विचारात न घेता माडाच्या मूळ नकाशात दर्शविलेले क्षेत्रफळ ग्राह्य धरून इमारतीचे अभिहस्तांतरण करण्यात यावे व बाढीव अनधिकृत बांधकामाबाबत स्वतंत्ररित्या कारवाई करण्यात यावी.

३. व्यवस्थापक विनियम २१ मधील तरतुदीनुसार अभिहस्तांतरणापूर्वी) गाळ्याची मूळ किमत इमारतीच्या मालकांचे सहकारी संस्थेकडे हस्तांतरण करताना संस्थेकडील १९९८ पूर्वीच्या सेवाआकाराच्यादराची रक्कम दंड यासह व वाढीय सेवा आकाराच्या दरातील मूळ रक्कम वसुल

करून तसेच सुधारित सेवा आकारावरील व्याजाची रक्कम एक वर्षात म्हाडाकडे भरण्याबाबत संस्थांकडून क्षतीपूर्ती बंधपत्र ” घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच अभिहस्तांतरण झाल्यानंतर सेवा आकार व इतर देय रक्कमा संबंधित संस्थेकडे जसे बृहन्मुंबई महानगरपालिका, विद्युत मंडळ यांजकडे परस्पर भरण्याची जबाबदारी संस्थेची राहील.

४. सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याबाबत संस्थाना आवाहन पत्र पाठवणे.

५. अभिहस्तांतरण्याच्या मोहिमेस वृत्तपत्रांतून व्यापक प्रसिध्दी देणे.

अभिहस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होणेसाठी वरीप्रमाणे कार्यपध्दती अवलंबवावी, जेणेकरून गाळेधारक आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरणात येणाऱ्या अडचणी दूर होऊन कार्यपध्दत सोपी, सुलभ आणि गतिमान होऊन अभिहस्तांतरणाची गती वाढण्यास मदत होईल.

#WeRunSocieties

 

 

 

 

 

 

 

 

Disclaimer: Thank you for visiting our site. The information provided as Dear Society (“we,” “us” or “our”) on https://www.dearsociety.in (the “Site”) is for general informational purposes only. We strive to provide our readers with accurate information that helps them learn more about the topics. It is not intended as a substitute for professional advice. We do not accept responsibility for the accuracy of information sourced from an external entity or take personal/ legal responsibility for your use of this information. Thank you.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here