अपार्टमेंट आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचा मेंटेनन्स आकारणीची पद्धत भिन्न का?

30
28189
Apartment & Society Maintenance Charges

अपार्टमेंट आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचा मेंटेनन्स आकारणीची पद्धत भिन्न का?
प्रश्न कळीचा मुद्दा आहे. परंतु सत्य आहे. अपार्टमेंट  आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचा मेंटेटन्स आकारणीची पद्धत भिन्न आहे. कारण अपार्टमेंटचे व्यवस्थापन हे महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम १९७० नुसार होते तर सहकारी गृहनिर्मा संस्थांचे व्यवस्थापन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अनुसार होते. 

मेंटेनन्स बाबत अपार्टमेंट कायद्यातील तरतूद

महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम १९७० कलम १० नुसार मालमत्तेचा सामान्य नफा सर्वामध्ये वितरीत केला जाईल आणि सामान्य क्षेत्र आणि सुविधांमधील अविभाज्य हिश्श्याच्या टक्केवारीनुसार अपार्टमेंट मालकांना देखभाल शुल्क आकारले जाईल अशी स्पष्ट तरतूद आहे. या तरतुदीमुळे अपार्टमेंटधारक त्यांचे उपविधीमध्ये मेंटेनन्सबाबत ठराव करू शकत नाहीत. अधिनियमाच्या विपरीत उपविधी असू शकत नाहीत. परिणामी मूळ अधिनियमात सुधारणे करणे आवश्यक आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मेंटेनन्सबाबत तरतूद 

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मेंटेनन्सबाबत  अधिक जागरूक असल्याचे दिसते. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे आदर्श  उपविधी  तयार करताना निधी उभारणीबाबत विस्तृत आणि स्पष्ट तरतूद करून ठेवण्यात आली आहे. 
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे उपविधी क्रमांक १३, १४, ६४ ते ६७ नुसार निधी उभारणी केली पाहिजे. तुमच्या संस्थेचे मान्यताप्राप्त उपविधीतील क्रमांक वेगळा असू शकतो. 

This blog may help you: Apartment VS CHS

समान मेन्टेनन्स  म्हणजे नक्की कोणता खर्च 
उपविधी क्रमांक ६६

उपविधी क्र. ६५(७) मध्ये निर्देशिल्याप्रमाणे संस्थेच्या सेवा-शुल्कात खालील बाबींचा समावेश असेल.
१) कार्यालयीन कर्मचारी, लिफ्टचालक, गुरखा, माळी तसेच संस्थेचे इतर कर्मचारी यांचे पगार,
२) संस्थेस स्वतंत्र कार्यालय असल्यास, त्याबाबतचा मालमता कर, वीज खर्च, पाणीपट्टी, इ.
३) छपाई, लेखनसामग्री व टपाल खर्च.
४) संस्थेचे कर्मचारी व समितीतील सदस्य यांचा प्रवास भत्ता व वाहन खर्च.
५) सदस्यांना द्यावयाचे बैठक भत्ते.
६) महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या ‘शिक्षण निधी’ पोटी द्यावयाची वर्गणी.
७) गृहनिर्माण संस्था महासंघ( हौसिंग फेडरेशन) व जिच्याशी संस्था संलग्न आहे अशी अन्य कोणतीही सहकारी संस्था यांची वार्षिक वर्गणी.
८) गृहनिर्माण संस्था महासंघ व अन्य कोणतीही सहकारी संस्था यांच्याशी संलग्न होण्याकरता द्यावयाचे प्रवेश फी.
९) अंतर्गत लेखापरीक्षा, सांविधिक लेखापरीक्षा, पुनर्लेखापरीक्षा असल्यास त्यांची फी.
१०) सर्वसाधारण सभेच्या तसेच समितीच्या व एखादी उपसमिती असल्यास तिच्या सभांच्या वेळी होणारा खर्च.
११) तज्ञाची नेमणूक, कोर्टकचेरी, कायदेशीर चौकशी या बाबींवरील खर्च.
१२) सामाईक इलेक्ट्रिसिटी चार्जेस
१३) सर्वसाधारण सभेत मान्य केलेल्या इतर खर्चाच्या बाबी.

मात्र कायदा, अधिनियम, उपविधी आणि संस्थेचे पोटनियम यांच्या विरोधाभासात या बाबी राहणार नाहीत.

 

६७. अ) समिती संस्थेच्या शुल्कातील प्रत्येक सभासदाचा वाटा खालील तत्वावर ठरवील.
१) मालमत्ता कर: स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केल्याप्रमाणे
२) पाणीपट्टी: प्रत्येक सभासदाच्या सदनिकेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण नळांच्या आकाराच्या आणि संख्येच्या प्रमाणात.
३) संस्थेची इमारत/इमारती यांची देखभाल व दुरुस्तीचा खर्च: संस्थेच्या सर्वसाधारण सभेने वेळोवेळी कायम केलेल्या दराने, मात्र सर्वसाधारण दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी कायम केलेला हा दर प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या दर साल किमान ०.७५ टक्के इतका राहील.
४) लिफ्टच्या देखभालीचा व दुरुस्तीचा आणि लिफ्ट चालविण्याचा खर्च ज्या बिल्डिंगसाठी लिफ्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या बिल्डिंग मधील सर्व सभासदांना सारख्या प्रमाणात, मग ते लिफ्टचा वापर करोत अगर न करोत.
५) निक्षेप निधी.(सिकिंग फंड) उपविधी क्र. १३(क) मध्ये दिलेल्या प्रमाणात दराने.
६) सेवा शुल्क: सर्व सदनिकांना सारख्या प्रमाणात
७) वाहन तळ शुल्क: उपविधी क्र.८३/८४ अन्वये सर्वसाधारण सभा निश्चित करील त्या दराने.
८) थकबाकीवरील व्याज: उपविधी क्र.७१ अन्वये ठरलेल्या दराने थकबाकीदार सभासदांकडून.
९) कर्जाच्या परतफेडीचा हप्ता व त्यावरील व्याज: कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थेने व्याजासहित निश्चित केलेली प्रत्येक हप्त्याची रक्कम.
१०) बिनभोगवटा शुल्क: उपविधी क्र. ४३ (क) अनुसार ठरविलेल्या दराने.
११) विमा हप्ता प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राचे प्रमाणात परंतु विमा कंपनीने व्यापार धंद्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सदनिकेत विशिष्ट प्रकारचा माल साठवण्याबद्दल जादा विमामुल्य आकारले असेल तर असे जादा विमामुल्य आकारले जाण्यास जे जबाबदार असतील त्यांना त्यांच्या सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात अशा जादा हप्त्याच्या रकमेचा भार उचलावा लागेल.
१२) भाडेपट्टी:- प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात
१३) बिगर शेतकी कर:- प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात
१४) शिक्षण आणि प्रशिक्षण निधी:- प्रत्येक सदनिका/घटकाला प्रती महिना १० रुपये या प्रमाणात.
१५) निवडणूक निधी:- यासाठीच्या बनविलेल्या नियमाप्रमाणे निवडणूक प्राधिकाऱ्यानी विहित केल्याप्रमाणे आणि संस्थेच्या सर्वसाधारण सभेने ठरविल्याप्रमाणे सर्व सभासदांनी समप्रमाणात देणे.
१६) कोणतीही इतर शुल्के सर्वसाधारण सभेने निश्चित केलेल्या प्रमाणात

निक्षेप निधी आणि देखभाल दुरुस्ती निधी कसा आकारावा?

उपविधी क्रमांक १३ :  संस्था सभासदांकडून खालील दरांनी अंशदाने घेऊन पुढे उल्लेखिलेले निधी निर्माण आणि स्थापित करील.
अ) नेहमीच्या वारंवार लागणाऱ्या दुरुस्तीवर होणार खर्च भागविण्यासाठी सर्वसाधारण सभेत (General body meeting) मूळ खरेदी किंमतीच्या आधारे वेळोवेळी ठरविण्यात येईल त्या दराने सभासदांकडून रकमा गोळा करून उभारण्यात येईल. मात्र हा दर त्यांच्या नावावर असलेल्या प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या जो वास्तुतज्ञाने प्रमाणित केला आहे त्याच्या ०.७५% दरसाल इतका कमीत कमी असावा.

ब) मोठ्या दुरुस्ती खर्चासाठीचा निधी क्षेत्रफळाच्या आधारावर दार निश्चित करून जशी आणि जेव्हा आवश्यकता असेल त्याप्रमाणे सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन उभारता येईल.

You may like this blog: सहकारी गृहनिर्माण संस्थांची थकबाकी वसुल!

क) सर्वसाधारण सभेत ठरविण्यात येईल त्या दराने सभासदाकडून रकमा गोळा करून  'निक्षेप निधी '(सिंकिंग फंड) उभारण्यात येईल. मात्र हा दार प्रत्येक गाळ्याच्या  बांधकाम खर्चाच्या आणि जो वास्तुतज्ञाने  प्रमाणित केला आहे. त्याच्या ०.२५% दरसाल इतका कमीत कमी असेल. यात जमिनीच्या प्रमाणानुसार किमतीचा अंतर्भाव नाही.

ड) सदस्यांकडून प्रत्येक सदनिकेमागे रु.१०/- दर महिना किंवा सर्वसाधारण सभेत ठरविल्याप्रमाणे अंशदान घेऊन शिक्षण आणि प्रशिक्षण निधी उभारणे

फ) संस्थेकडून निधीचा वापर 

१४)    संस्थेस, निधीतील रकमांचा वापर खाली नमूद केलेल्या पध्द्तीने करता येईल:-
अ)   राखीव निधी:- संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्त्या, त्यांची देखभाल व नूतनीकरण यावर होणाऱ्या खर्चासाठी, संस्थेला निधी उपयोगात आणता येईल.
ब)     समितीस संस्थेच्या मालमत्तेची दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरण यावरील खर्चासाठी संस्थेला दुरुस्ती व देखभाल निधी उपयोगात आणता येईल.
क) इमारत /इमारतीची पुनर्बांधणी करणे,संस्थेच्या स्थापत्य  शास्त्रज्ञाच्या मताने इमारत /इमारीतीस बळकटी आणण्यासाठी आवश्यक असलेले जादा बांधकाम किंवा बांधकामातील फेरफार करणे किंवा त्याने दिलेल्या  दाखल्यास अनुसार इमारत/इमारतीत  मोठ्या / असामान्य /महत्वाच्या दुरुस्त्या करणे यासाठी  संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ठराव संमत करून संस्थेला निक्षेप निधी (सिंकिंग फंड) उपयोगात आणता येईल.
ड) अधिनियमाच्या कलम २४ अ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे शिक्षण आणि प्रशिक्षण निधीचा वापर करता येईल संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या स्पष्ट पूर्व मान्यतेनेच सर्व निधीचा वापर असेल.

This Article is recommended for you: बिल्डरकडून मेन्टेनन्सचा हिशोब असा घ्या!

ग)निधीतील रकमांची गुंतवणूक

१५)     संस्थांचा निधी संस्थेच्या कामकाजासाठी उद्देशासाठी वापरला नसेल तर अधिनियमांच्या     कलम ७० अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे गुंतवावा किंवा ठेवावा. मात्र संस्थेचा निधी वरील कलम ७० अन्वये, मान्यताप्राप्त प्रकारांपैकी एका प्रकारे दीर्घ मुदतीसाठी, गुंतवणुकीवरील मिळालेल्या व्याजासह वरील प्रमाणेच गुंतवण्यात येईल.
ब) उपविधी क्र. ६७ (अ) मध्ये नमूद केलेल्या तत्वांच्या आधारावर समिती प्रत्येक सदनिकेच्या बाबतीत संस्था शुल्क आकारणी निश्चित करील.

६८. संस्थेने तिच्या मालमत्तेबाबत खाली दिलेली दुरुस्ती आणि देखभाल तिच्या खर्चाने पार पाडली पाहिजे.
अ) १) सर्व अंतर्गत रस्ते २) कुंपण भिंती ३) बाहेरील पाण्याच्या पाईप लाईन्स ४) पाण्याचे पंप ५) पाणी साठवण्याच्या टाक्या ६) गटार मार्ग ७) मलकुंड ८) जिने ९) गच्च्या आणि तटाच्या भिंती १०) सर्व सदनिकांच्या छतांची संरचनात्मक दुरुस्ती ११) जिन्यातील दिवे १२) रस्त्यावरील दिवे १३) इमारत/इमारतींच्या बाहेरील भिंती १४) पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या गळतीच्या अंतर्भावासह पाण्याच्या सर्व गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप आणि ड्रेनेज लाईनमुळे होणाऱ्या गळत्या १५) सदनिकेतील मुख्य स्विच पर्यंतच्या सर्व विद्युत लाईन्स १६) उदवाहने १७) गच्चीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या गळतीच्या कारणास्तव सर्वात वरच्या मजल्यावरील सदनिकांच्या छताला आणि त्यावरील प्लास्टरला हानी पोहोचणे. १८) विद्युत जनित्रे १९) सुरक्षा उपकरणे जसे सीसीटीव्ही, इंटरकॉम, ग्रुप मोबाईल, मास डाटा शेअरिंग डीव्हाईसेस, सायरन, बेल इ. २०) पावसाच्या पाण्याची साठवण २१) गटार, पावसाचे पाणी आणि पाणी प्रक्रिया संयंत्र २२) विनिर्दिष्टपणे कोणाला वाटप केले नसेल तर स्विमिंग पूल, व्यायाम शाळा, सोना बाथ, कॉफी हाउस २३) सामाईक वाहनतळ जागा २४) सौर आणि पर्यायी विद्युत साधने २५) बगिचा २६) समाज सभागृह.
ब) उपविधी क्र. १५९ (अ) मध्ये समावेश नसलेल्या सर्व दुरुस्त्या सभासदांनी त्यांच्या खर्चाने कराव्यात. टॉयलेट, सिंक इत्यादींमुळे अंतर्गत गळत्यांची दुरुस्ती संस्थेला कळवून संबंधित सदनिकाधारक त्यांच्या खर्चाने करील.

६९. सदस्याने द्यावयाच्या संस्थेच्या शुल्काबाबतचे बील/मागणी पत्र संस्थेचे सचिव उपविधी क्र. ६७(अ) च्या आधारावर तयार करील आणि यासाठी समितीने निश्चित केलेल्या तारखेला किंवा त्याअगोदर सर्व सभासदांना ते पाठवील. संस्थेच्या प्रत्येक सदस्य समितीने निश्चित केलेल्या अशा कालावधीत बिलात/मागणी पत्रात उल्लेखिलेल्या रकमेचा संपूर्ण भरणा करील.

अपार्टमेंट रद्द करून सोसायटी नोंद करता येते का ?
हो नक्कीच येते!!!!
या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क करा .....

आपल्या प्रतिक्रिया कळवा

श्री.युवराज उत्तम पवार
संस्थापक अध्यक्ष
डिअर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
मोबाइल क्रमांक ९१७५७३३९५७

contact@yuvrajpawar.com

#WeRunSocieties

30 COMMENTS

  1. माननीय अध्यक्ष
    मला जाणून घ्यायचे आहे की bylaws मधील पाणीपट्टी ही कशा संदर्भात उल्लेख केलेला असतो.
    Means
    पाणीपट्टी- प्रत्येक सभासदाच्या गाळ्यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण नळांच्या आकाराच्या आणि संख्येच्या प्रमाणात.

    याचा अर्थ काय. आणि ती coporation नळ साठी असते का society पाणी पंप बसवते त्याची असते.
    Please

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  2. सोसायटी एका फ्लॅटचे किती रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे आकारु शकते? तसेच स्वतःच्या मालकीची वाहन पार्किंग असल्यास त्याचे चार्जेस सोसायटी आकारु शकते का?

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  3. Dear Sir /Poonam Madam ,I am Chaturvedi from Divyajyot co. hsg. soc. Badlapur W 421503 ,I should be Guidelines for conveyance deed & society charges according by law ,please give me timing first telephonic and then met you Mob. no. 9022484571/9822608279

    Thanks Sir

  4. आमच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे…त्याचा लागणारा खर्च ५०लाख आहे…पण माझी आशी शंका आहे की सोसायटीने हा खर्च प्रत्येक सभासद कडून समान विभागून घ्यावा की क्षेत्रांश पद्धतीने घ्यावा…

  5. hello therе and thank you for your іnformation – I
    hɑve ⅾefinitely picked up somethіng new from right here.
    I did however expertise sеveral technical points using thіs site, aѕ I experienced to гeload the site lots
    of times previous to I could get іt to load correctlү.
    I haԁ Ƅeen wondering if your web host is OK?
    Not tһat І’m complaining, but slow loading instɑnces times will
    somеtimes affect your placement in google and could damage your high quality sϲore if ads and marketing
    with Aɗwords. Anyway I’m adding this RSS to my e-mail and could look out for a lot morе of
    your respective interesting content. Make sure you update
    this agaіn soon.

  6. W᧐w, amazing blog layout! How ⅼong have you ƅeen blogging for?

    you make blogging look easy. The overall look of your wеb sіte
    is fantastic, let alone the content!

    • माननीय अध्यक्ष
      मला समजून घ्यायचे आहे की bylaws मध्ये दिलेल्या पाणीपट्टी ही कशा संदर्भात उल्लेख केलेला असतो,
      पाणीपट्टी प्रत्येक सभासदाच्या गाळ्यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण नळांच्या आकाराच्या आणि संख्येच्या समप्रमाणात
      याचा अर्थ काय ? पाणीपट्टी सोसायटी ने कशा प्रकारे आखावी याची माहिती मिळावी ही विंनती.

  7. Τoday, I went to the beachfront with my children. I found a sea shell and
    gave it to my 4 yеar old daughter and said “You can hear the ocean if you put this to your ear.” She placed the shell to her ear and screamed.
    Therе was a hermit crab insіԁe and it pinched her
    ear. She never wants to go back! LoL I know this іs cߋmplеtely off topic but
    I had to tell someone!

  8. Ꮋeya i am for the first time һere. I found this
    board and I find It truly useful & it helped me oᥙt much.
    I am hoping to give something back and aid otherѕ like
    you aided me.

  9. Hеllo There. I found your weblog using msn. Тhat is
    а really smɑrtly wrіtten article. I will make sure to bookmark it and return to learn more of your helpful info.
    Thank you for the post. I’ll certainly comeback.

  10. I saνor, cause I discovered just wһat I used to bе looking for.
    You’ᴠe ended my 4 day long hunt! God Ᏼless
    you man. Have a ɡreɑt day. Bye

  11. аll the time i used t᧐ read smaller articles or reviews that as wеll clear their
    motive, and thɑt is aⅼѕo hapρening with this post which Ӏ am reading now.

  12. Eхcellent blog here! Also your web site loads up very fast!
    What host aгe you using? Can I get your affiliate link to y᧐ur host?

    I wish my site loaded up as fast as yours lol

  13. mi socity madhe coaching class ghete..and mi socity madhe rahte mazach flate madhe class ghete.ter mi to gheu shakte ka .

  14. Ꭼverything is veгy open with a very clear description of the chalⅼenges.

    It was reɑⅼly informative. Y᧐ur website iѕ useful.

    Many thanks for sharing!

  15. Valuable info. Fortᥙnate mе I diѕcovеred your website by chance,
    and I’m stսnned why thіs ⅽoincidence dіd not came about earlier!
    I bookmarkеd it.

  16. Great рⲟst. I was checking constantly this blog and I’m impressed!

    Very helpful info specialⅼy the last part :
    ) I ϲare for such information a lot. I was seeking this certain info for a long tіme.
    Thank you and best of luck.

  17. Hmm іt appears like your site ate my fіrst comment (it was
    supeг long) so I guess I’ll just sum it up what I һad written аnd ѕаy, I’m
    thoroughly enjoying your blog. I too am an aspiring blog blogger but I’m still new to everything.
    Do yоu have any tіps and hints for beɡinner blog writers?
    I’d certainly aрprеciate it.

  18. Τhis is a great tip particularly to those new to the blogosphere.

    Simple but very accurate info… Appreciate your sharing this one.
    A must read ɑrticle!

  19. सोसायटी मधे दुकान गाळा आहे तर मेन्टनस कसा द्यायचा सदर सोसायटी मध्ये दोन तीन फ्लॅट आहे मुलाचा माझा एकत्र दोन फ्लॅट मिळुन ऐक फ्लॅट केला आहे तर मेन्टनस खर्च किती हवा मुलीचा प्लॅट वेगळाच आहे तो विषय नाही तर दोन फ्लॅट एकत्र करून जर ऐक फ्लॅट आहे तर मेन्टनस ऐक फ्लॅट म्हणून असावा असे वाटते व सदर सोसायटी मध्ये गाळा पण आहे तर मेन्टनस कसा व किती प्रमाणात असावा

  20. मी मांजरी बृद्र्क,पुणे येथे राहतो,आमची सोसायटी आद्याप रजिस्टर झाली नाही.एकूण 11 फ्लॅट आहेत. परंतु तीन फ्लॅट मालक गेली वर्षभर मासिक मेंटेन्स थकित ठेवला आहे. ते मागील मेंटेन्स देण्यास तयार नाहीत. त्यांना वारंवार विनंती करून पाहिलं. त्यांना पाण्याचे कनेक्शन बंद करू असे whatsup वरून सांगितले परंतु ते जुमानत नाहित.तर काय करावे. त्यामुळे बिल्डिंगचे रंग काम,बिल्डिंग समोरील रस्त्यावर मुरूम इत्यादी पैसा शिवाय करता येत नाही. कृपया आपला सल्ला मिळावा.ही विनंती.

  21. माननीय अध्यक्ष
    मला समजून घ्यायचे आहे की bylaws मध्ये दिलेल्या भोगवटा शुल्काची आकारणी
    (10% ही )कशी केली जाते, आणि बिन भोगवटा शुल्क कुठल्या खर्चावर आकारले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here