सोसायटीने NOC (नाहरकत प्रमाणपत्र) सात दिवसात द्यावी. 

6
19029
नाहरकत प्रमाणपत्र

Read In English 

सभासदांना संस्थेकडून विविध कारणासाठी उदा. सदनिका विक्री करणे, गहाण ठेवणे, दुरुस्ती करणे, भाडयाने देणे इत्यादी बाबत नाहरकत प्रमाणपत्र सोसायटीकडे मागणी करावी लागते. अध्यक्ष. सचिव दाखला देण्याबाबत  टाळाटाळ करण्याच्या तक्रारी नित्याने येत असतात, त्यामुळे सहकार आयुक्त यांनी दिनांक ०१ जानेवारी, २०१७ रोजीच्या परिपत्रकात ना हरकत दाखला ७ दिवसात देण्याची बाब नियमाधीन केली आहे.  ना हरकत पत्रातील अटी व शर्ती बाबत सभासद व संस्था यांच्यात अनेकदा मतभेद निर्माण होतात. निबंधकाकडे देखील या संबंधी मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने दिनांक ०१ जानेवारी, २०१७ रोजीच्या परिपत्रकात खालीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.

१.सभासदास ज्या कारणासाठी ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे ते कारण नमूद करून सभासदाने लेखी अर्ज संस्थेकडे सादर करावा व अर्जाची रीतसर पोहच घ्यावी, संस्थेने अर्ज न स्वीकारल्यास अथवा पोच न दिल्यास रजिस्टर एडीने / स्पीड पोस्टन संस्थेस अर्ज पाठवावा.

२. संस्थेने सभासदाकडून ना हरकत प्रमाणपत्र मागणी अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांका नंतरच्या घेण्यात येणान्या लगतच्या व्यवस्थापन समिती सभेपूढे ठेवावा. व त्या सभेत निर्णय घेऊन ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ सभासदास देणेत यावे.

You may like this blog: सोसायटी स्तरावर तक्रार निवारण करण्यासाठी उपविधीत काय सुधारणा करावी?

३. सभासदास ज्या कारणासाठी संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र हवे आहे. त्याबाबत आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित सभासदाची राहील. तसेच अशा सभासदांकडून संस्थेची येणे बाकी असल्यास सभासदाने ती अर्जाचे वेळी संस्थेकडे भरली पाहीजे आणि संस्थेने अशी येणे रक्कम वसुल करुन घेऊन ना हरकत प्रमाणपत्र दिले पाहीजे.

४. आदर्श उपविधीमध्ये सदनिका / गाळा खरेदीसाठी एम्प्लॉयर, बँक, एल.आय.सी. वगैरे कडून कर्ज घेण्यासाठी संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असणार नाही, अशा स्वरुपाची तरतुद असली तरी सभासदांनी मागणी केल्यास असे ना हरकत प्रमाणपत्र देणे संस्थेवर बंधनकारक राहील. तसेच अशी यंत्रणा विशिष्ट नमुन्यात ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करत असतात. अशावेळी संस्थेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्राच्या आधारे मागणी केलेल्या विशिष्ट नमुन्यात संस्थेने सभासदास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे.

See our latest blog:दस्त नोंदणी

५. ना हरकत प्रमाणपत्र मागणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर नजिकच्या काळात काही कारणास्तव व्यवस्थापन समिती सभा होऊ शकत नसल्यास आणि सभासदास तातडीची गरज असल्यास अर्ज प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त स्वाक्षरीने ७ दिवसाच्या आंत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे व त्याची कार्योत्तर मान्यता व्यवस्थापन समितीच्या पुढील सभेत घ्यावी.

६. संस्थेकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संस्थेने नजिकच्या व्यवस्थापन समिती सभेत निर्णय न घेतल्यास किंवा सभासदांची तातडीची गरज असूनही संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी असे प्रमाणपत्र उपरोक्त नमूद मुदतीत न दिल्यास अथवा पुरेशा कारणाशिवाय नाकारल्यास सभासदास संबंधित निबंधकाकडे अर्ज करता येईल, असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर निबंधक सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकुन घेऊन ना हरकत दाखला देण्याबाबत संस्थेस आदेशीत करेल. वरीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करुन संस्थांनी सभासदांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.

७. सभासदाने अर्जासोबत विशिष्ट नमुना सादर केलेला नसल्यास संस्थेने पुढील नमुन्यात सभासदास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे.

This might help you:Model Tenancy Act, 2020

ना हरकत पत्राचा नमुना :

 

आपल्या प्रतिक्रिया कळवा

श्री.युवराज उत्तम पवार
संस्थापक अध्यक्ष
डिअर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
मोबाइल क्रमांक ९१७५७३३९५७

contact@yuvrajpawar.com

#WeRunSoceity

1. Website –     https://www.dearsociety.in/
2. Instagram –  https://instagram.com/dearsocietymh?igshid=NmE0MzVhZDY=
3. LinkedIn –    https://www.linkedin.com/company/dear-societyin/
4. Facebook –   https://www.facebook.com/dearsocietyMH?mibextid=ZbWKwL

6 COMMENTS

  1. मला ना हरकत दाखला देण्यास सोसायटी टाळा टाळा करत आहे आहे काय करावे ..

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  2. माननीय साहेब

    मी निलेश सुदाम तांबे. मी गोराई येथे सुविधा को ऑरेटिव्ह सोसायटी मध्ये राहत आहे. मी माझा रूम विकत आहे. त्या बद्दल मी सचिवांकडे रीतसर अर्ज २४/१२/२०२२ रोजी सुपूर्द केला आहे व तशी एक पोचपावती सुद्धा घेतली आहे. पण आज दीड महिना झाला आहे तरी सचिव ना हरकत प्रमाणपत्र देत नाही आहेत. नंतर आम्ही म्हाडा उपा निंबधक साहेबांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी सुद्धा सचिवांना आदेश वजा समज देऊन पत्रात लिहिले आहे की आम्हाला ताबडतोब ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. पण त्यांचा आदेश सुद्धा ते मनात नाही आहेत व अजून आम्हास सहकार्य करत नाही आहे त्या साठी काय करावे त्याचे मारगदर्शन कराल का? माझा नी आहे ९६५३४०६०५९.

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  3. वडिलांनी मुलीला बक्षीस पत्र करुन सद निका हस्तांतरीत करण्यासाठी ना हरकत पत्राची गरज आहे का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here