डिड ऑफ अपार्टमेंटच्या आधारे सदनिकाधारक त्यांचे नाव सातबारा, मिळकत पत्रिकेवर लावू शकतात याची जाणीव ८० टक्के अपार्टमेंट धारकांना नाही. पुण्यासारख्या विकसित शहरात सुद्धा हे अज्ञान आहे, यावर विश्वास बसणार नाही. मंडळी, अपार्टमेंटला मराठीत वेश्म म्हंटल जात. वेश्म अधिनियम १९७० मधील तरतुदीनुसार अपार्टमेंटची नोंद होते. जो कोणताही बांधकाम प्रकल्प ज्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका बांधल्या जातात तेथे घोषणापत्र म्हणजे डिड ऑफ डिकलरेशन निष्पादित करून संबंधित इमारत वेश्म अधिनियमाच्या उपबंधाधीन केली जाते, व प्रत्येक वेश्म मालकाला वेश्म विलेख म्हणजे डिड ऑफ अपार्टमेंट नोंद करून जमिनी व सामायिक सोइसुविधांतील अविभक्त हिस्सा दिला जातो. या वेश्म विलेखाच्या आधारे वेश्ममालक सातबारा अथवा मिळकत पत्रिका त्यांचे नावावर करून घेऊ शकतात नव्हे घेतलंच पाहिजे.
मोफा कायद्याचे कलम ११ चा लाभ घ्या :
डिड ऑफ अपार्टमेंटलाच खरेदीखत असेही म्हंटले जाते. राज्यात नोंदणीकृत वेश्म संख्या ज्ञात नाही, तरी अंदाजे ४० हजार वेश्म संस्था असू शकते. अनेक ठिकाणी बिल्डरने घोषणापत्र नोंद केले आहे,प्रकल्पाची काही सदनिकाधारकांना वेश्म विलेख नोंद करून दिला परंतु उर्वरित अनेकांना वेश्म विलेख नोंदच करून दिलेला नाही, त्यामुळे वेश्म मालकांना त्यांचे नाव सातबारा अथवा मिळकत पत्रिकेवर लावणे शक्य होत नाही. अशा वेळी मोफा कायद्याचे कलम ११ अन्वये मानीव अभिहस्तांतरण पर्याय उपलब्ध होतो. मानीव अभिहस्तांतरण ज्या पद्धतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू आहे, त्यानुसारच वेश्म मालकांना सुद्धा लागू आहे. एका पेक्षा अधिक वेश्म एकत्र येऊन संयुक्त अर्ज करू शकतात.
मानीव अभिहस्तांतरचे फायदे :
- अभिहस्तांतरण झाले म्हणजे जमिनीचे तुम्ही मालक होता.
- शासनाच्या धोरणात बदल झाल्याने जर बांधकाम चटईक्षेत्र ( FSI ) वाढ झाली तर लाभ वेश्ममालकांना होतो.
- TDR उपलब्ध करून अधिकचे बांधकाम करून लाभ मिळवता येतो.
- इमारतीवर मोबाईल टॉवर किंवा जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळू शकते.
- पुर्नविकास करणे सोपे होते.
- बिल्डर पार्किंगची जागा आणि टेरेसवर हक्क संपादित होतो.
- बिल्डर वाढीव मजल्यांचे अनधिकृत बांधकाम करता येत नाही.
- विक्री किंमत वाढते. मिळकत निर्वीवादीत समजली जाते. सदनिका विक्री करणे सोपे होते.
You might like this blog also: दस्त नोंदणी
अपार्टमेंट खरेदी करताना काळजी घ्या. सदनिका खरेदी करत असाल आणि त्याठिकाणी अपार्टमेंट नोंद झालेली असेल तर खरेदी करावयाचे अपार्टमेंटधारकांचे नाव सातबारा अथवा मिळकत पत्रिकेवर नसेल तर ती सदनिका खरेदी करणे अधिक खर्चिक आणि त्रासदायक होऊ शकते.
Click here for Apartment to CHS conversion.
आवश्यक कागदपत्र :
विहित नमुन्यातील अर्ज, घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लरेशन), करारनामा, भोगवटा दाखला अथवा नियमितीकरण दाखला अथवा स्वयंघोषणापत्र, चालू ७/१२ उतारा / मिळकत पत्रक, मंजूर बांधकाम नकाशा, वास्तुविशारदाचा दाखला, कागदपत्र खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्वप्रमाणपत्र, रु. २०००/- ची कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन फी.
Click here for more information about Apartment conveyance.
वेश्म विलेख नोंद करताना घ्यायची काळजी :
वाचकहो! जर तुम्ही वेश्म संस्थेत सदनिका खरेदी केली असेल आणि बिल्डरने तुमची मिळकत वेश्म अधिनियमाच्या उपबंधाधिन करून सदनिकाधारकांना वेश्म विलेख नोंदणीसाठी आग्रह धरतात. वेश्म विलेख नोंद करण्यापूवी डोळसपणे वाचन करावे. अनेकदा बिल्डर वेश्म विलेखात बेकायदेशीर अटीशर्ती टाकतात जसे पार्किंग आणि मोकळ्या जागेवर बिल्डर हक्क राखून ठेवतात, टेरेस वर संपूर्ण अधिकार बिल्डर स्वतःला किंवा बेकायदेशीर विक्री केलेल्या व्यक्तीला राखून ठेवतात, प्रकल्पातील काही भाग काही अपार्टमेंटसाठी राखीव ठेवतात, भविष्यातील वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकावर हक्क राखून ठेवतात, तसेच सुधारित बांधकाम नकाशा मंजूर करून घेण्याचे अधिकार लिहून घेतात. त्यामुळे अशा प्रकारचा वेश्म विलेख नोंद न करता मानीव अभिहस्तांतरण करणे उत्तम!
मंडळी, राज्यातील वेश्म संस्कृती अतिशय दुर्लक्षित आहे. १९७० साली अधिनियम अमलात आला तरी या अधिनियमातील त्रुटी दूर करण्यापासून शासन स्थरावर यथोचित आणि योग्य वेळी योग्य बदल केले गेले नाहीत. परिणामी या अधिनियमाचा उपयोग बिल्डरांद्वारे सदनिका धारकांना छळण्यासाठी व पिळवणुकीसाठी केला गेला. मात्र मागील २ वर्षात डिअर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन आणि इतर सामाजिक संस्थांच्या पाठपुराव्यामुळे अधिनियमात चांगले बदल झाले आहेत.
दिलासायक बातमी!
ज्यांच्या घोषणापत्रात अथवा वेश्म विलेखात बेकायदशीर परिच्छेद, कलम टाकले आहेत त्यांना पुन्हा घोषणापत्र अथवा वेश्म विलेख नोंदणी करण्याचे अधिकार वेश्म मालकांच्या संघटनेला प्राप्त झाले आहेत. बिल्डरचा काहीही संबंध राहिलेला नाही. या नव्या सुधारणांचा लाभ घेऊन तात्काळ आवश्यक दुरुस्ती दस्त नोंद करून जाचातून मुक्त व्हा.
[…] Read in Marathi […]