दस्त नोंदणी

13
10523
Deed registration

Read In English

होय! लाच न देता दस्त नोंदणी सहज शक्य आहे. हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचल्यावर तुम्हाला दस्त नोंदणीबाबत नाविन्यपूर्ण माहिती मिळेल. मृत्युपत्र, खरेदीखत, अभिहस्तांतरण, खरेदीखत, करारनामा, भाडेपट्टा, गहाणखत, अदलाबदल पत्र, बक्षीसपत्र, वाटपपत्र असे विविध प्रकारचे दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त अधिकार दुय्यम निबंधक यांना असून राज्यात दुय्यम निबंधकांची एकूण 507 कार्यालये आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक तालुक्यासाठी एक कार्यालय अस्तित्वात आहे. दस्त नोंदणीची कार्यवाही नोंदणी अधिनियम, 1908 या कायद्यान्वये केली जाते. या कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने दस्त नोंदणीची सविस्तर कार्यपध्दती महाराष्ट्र नोंदणी नियम, 1961 अन्वये ठरवून देण्यात आलेली आहे.

 

दस्त नोंदणीसाठी पक्षकारांनी करावयाची पूर्वतयारी: 

  • दस्त तयार करणे.
  • दस्त प्रकारानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे, परवानग्या संकलित करणे. 
  • मिळकतीचे मूल्यांकन तपासून घेणे. 
  • मुद्रांक शुल्क,  नोंदणी फी, दस्त हाताळणी फी भरणे.
  • दस्तावर साक्षीदारांसमोर सहया/ निष्पादन (Execution) करणे.
  • दस्ताची माहिती पब्लिक डाटा एंट्रीद्वारे भरणे.
  • ई-स्टेप इन या सुविधेद्वारे दस्त नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ घेणे. 

Click here for Deed registration.

दस्त नोंदणीसाठीसोबत आवश्यक कागदपत्रे:

  1. योग्य मुद्रांक शुल्क भरलेला व सर्व पक्षकारांनी सह्या केलेला मूळ दस्त, 
  2. ई-पेमेंटद्वारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरलेली असल्यास त्यासाठीचा पुरावा,
  3. सर्व पक्षकारांची ओळखपत्रे, 
  4. ओळख पटविणा-या व्यक्ती व त्यांची छायाचित्रे असलेली ओळखपत्रे, 
  5. दस्त प्रकारानुसार आवश्यक पूरक कागदपत्रे,
  6. दस्त कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कुलमुखत्यारधारकाने निष्पादित केला असेल मूळ मुखत्यारपत्र, त्याची सत्य प्रत व कुलमुखत्यारपत्र अस्तित्वात (अंमलात) असल्याबाबतचे विहित नमुन्यातोल घोषणापत्र,

दुय्यम निबंधकांचा अतिशहाणपणा: 

मंडळी! कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा १२ वी पास अर्हता असेलेले दुय्यम निबंधक जेंव्हा हाडतूड करतात. तेंव्हा लोकशाहीची क्रूर चेष्टा आणि शिक्षणाच्या आयचा घो झालेला असतो. आवश्यक नसलेली कागदपत्र मागणी करून अथवा दस्तात फालतु चुका काढून जाणीवपूर्वक दस्त नोंदणीस तोंडी नकार दिला जातो. अन्यायग्रस्त पक्षकार किंवा वकील हताश होऊन परत जातात, ओळख काढून दुय्यम निबंधक किंवा त्यांच्या  एजन्ट मार्फत लाच देऊन आहे त्या कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करून घेतात. 
Read other latest article: Land survey

दस्त नोंदणीस तोंडी नकार दिल्यास काय करावे? 

दस्त नोंदणीस तोंडी नकार देणे नियमबाह्य आहे. दस्त नोंदणीसाठी सादर केल्यावर पुढील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे दस्त नोंदणी करण्यावर कोणत्याही कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल, तर तो दस्त नोंदणीस स्विकारला जातो. दस्त नोंदणीला सादर केला की खालील टप्यानुसार  कार्यवाही करण्यास दुय्यम निबंधकांना आग्रह धरा.
1. दस्त सादर केल्यावर टोकन रजिस्टरमध्ये नोंद करून टोकन देण्याचा आग्रह धरा.
2. दुय्यम निबंधकाद्वारे दस्ताची पडताळणी झाल्यावर कागदपत्र किंवा दस्तातील चुका काढल्यास त्या चुका योग्य असल्यास सेवाहमी नियम ६ नुसार पोच मागणी करा अन्यथा जर दुय्यम निबंधक यांना दस्ताची नोंदणी नाकारावयाची असेल, तर त्यांनी नोंदणी अधिनियम, 1908 कलम 71 नुसार दस्त नोंदणी नाकारण्याची कारणे नमूद करून लेखी आदेश पारित करून आदेशातील कारणे नोंदणी पुस्तक क्रमांक 2 मध्ये नमूद करण्यास सांगावे तसेच दस्त नोंदणीस नाकारला’ अशा आशयाचे पृष्ठांकन/शेरा दस्तावर नमूद करून दस्त संबंधित पक्षकारास परत करणे आणि पुस्तक क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या नोंदीच्या प्रती विनाशुल्क व विनाविलंब पुरविणे आवश्यक असल्याने त्याची मागणी करणे. जर अशा पद्धतीचा आग्रह धरल्यास दुय्यम निबंधकाला एकही रुपया लाच न देता दस्त नोंदणी होण्यास मदत होते. देशाची सेवा घडेल.

हमी कायद्याची तरतूद: 

१) एक दिवसात दस्त नोंदणी करणे हे सेवा हमी कायद्याने बंधनकारक आहे. एक दिवसात दस्त नोंदणी न केल्यास दुय्यम निबंधक यांच्या विरोधात जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडे पहिले अपील दाखल करता येते. व दुसरे अपील नोंदणी महानिरीक्षक तर अंतिम अपील लोकसेवा हक्क आयोगाकडे करता येते. न्यायोचीत कारण नसल्यास दुय्यम निबंधकाला  ५०० ते ५००० रुपयापर्यंत शास्ती लावली जाते. व दुसऱ्यांदा कसूर केल्याचे सिद्ध झाल्यास कारणे दाखवा नोटीस काढली जाते. तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. 

लाच न देता काम करून घ्या. कायद्याचा पुरेपूर वापर करून देशाची सेवा करा. 

आपल्या प्रतिक्रिया कळवा

श्री.युवराज उत्तम पवार
संस्थापक अध्यक्ष
डिअर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
मोबाइल क्रमांक ९१७५७३३९५७

contact@yuvrajpawar.com

#WeRunSoceity

13 COMMENTS

  1. 42 ड अंतर्गत बिगर शेती झालेल्या जमिनीमध्ये स्वतः प्लॉट layout तयार करून विक्री केली तर चालते का?

  2. जर नोंदणी उपनिरीक्षकाने नोंदी करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली नाही व दस्त नोंदणी केला तर अशा वेळेला काय करावे.

  3. […] दस्त नोंदणी साठी जमा केला असता अधिकाऱ्यांना  नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ५२, महाराष्ट्र नोंदणी नियम १९६० चे नियम ३९ तसेच कलम ३२ चे पालन करण्याचा आग्रह धरा , दस्त नोंदणीस नकार देत असतील तर तर कलम ७१ नुसार कार्यवाही करण्यास सांगा, आणि चमत्कार पहा! […]

  4. Abhihastantaran dast nondani karun jamin kharedi keli ahe 2011 Sali pan kahi karnastav 7/12 la nav lavaych rahun gel pan atta jyachakadun jamin kharedi keli hoti tyacha navavar 7/12 made kahich jamin shillak nasalyach dakvat ahe atta pudhe kay karaych ha dast kahich upyogacha rahila nhi ka atta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here