नवा भाडे कायदा येतोय!

1
1394
Landlord & Tenant Law

Read in English

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच भाडे कायदा २०२० ला मंजुरी दिली आहे. लवकरच अध्यादेश काढला जाईल किंवा आगामी अधिवेशनात हा कायदा संमत करून घेतला जाईल. केंद्र सरकारने संमत केलेल्या कायद्यात राज्य त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल करून हा कायदा अमलात आणू शकतात. भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील अविश्वास कमी करू शकेल, वाद निर्माण झाल्यास लवकर न्याय देऊ शकेल, अशी अपेक्षा निर्माण करणार विधयेक येतंय. हे विधेयक अधिनियमात रूपांतरित झाल्यास राज्यातील भाडे नियंत्रण अधिनियम इतिहासजमा होईल. प्रथम दर्शनी भाडे कायदा  भाडेकरूंवर अन्याय करणारा आणि घरमालकांना दादागिरी करण्याची संधी देणारा कायदा असल्याचे खालील माहितीवरून वाटू शकते. कोणताही कायदा अमलात आणल्या खेरीज त्यातील त्रुटी लक्षात येत नाहीत. त्यामुळे आम्ही नवीन येणाऱ्या प्रत्येक कायद्याचे समर्थन करतो. कारण बदल चांगला असतो.

काय खास आहे या अधिनियमात?

१) घरमालक आणि भाडेकरू यांचे संरक्षण आणि जबाबदारी निश्चित केल्या आहेत.
२) उपजिल्हाधिकारी दर्जाचा भाडे अधिकारी (Rent Authority) नेमला जाणार.
३) भाडे न्यायालय (Rent Court) व भाडे न्यायाधिकरण (Rent Tribunals) अस्तित्वात येणार.

You may like this blog also: Don’t rush to move into a new home!

या विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये 

१) घर भाड्याने देण्याचा करार लेखी तसेच  नोंदणीकृत करणे बंधनकारक करण्यात आले आहे,
तसेच भाडेकरार दोन प्रतीत करावा लागणार, एक प्रत घरमालक अन एक प्रत भाडेकरूलाही द्यावी लागणार\
२) रहिवासी घरासाठी सुरक्षा ठेव म्हणून २ महिन्याचे भाडे आकारता येईल तर व्यापारी गाळ्यासाठी सुरक्षा ठेव म्हणून ६ महिन्याचे भाडे आकारता येईल
२) भाडेकराराबाबत भाडे अधिकाऱ्याला विहित नमुन्यात (FORM FOR INFORMATION OF TENANCY) कळवणे बंधनकारक तसेच आधारकार्ड आणि पॅन कार्ड सोबत जोडणे आवश्यक असणार 
३) भाडे अधिकाऱ्यांनी  भाडेकरार व सोबतचे कागदपत्र त्यांचे संकेत स्थळावर टाकावी लागणार. 
४) भाडेकरार संपल्यावर घर रिकामे न केल्यास पहिल्या २ महिन्यासाठी दुप्पट व त्यानंतरच्या महिन्यासाठी चौपट भाडे वसुल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 
५) घरमालकाच्या मृत्यूनंतर  भाडेकरार त्याच्या वारसांवर बंधनकारक असणार आहे. 
६) घराचा पोट हिस्सा भाड्याने द्यायचं असल्यास पुरवणी भाडेकरार करावा लागणार तसेच त्याबाबत भाडे अधिकाऱ्याला कळवावे लागणार.

७) या अधिनियमात तरतूद केल्याप्रमाणे किरकोळ व  विशिष्ट कामांचा खर्च भाडेकरूला करावा लागणार, त्याने न केल्यास घरमालकास सदर खर्च वसूल करता येणार 
८) भाडेकरूने घर खाली करण्याच्या दिवशी घर मालकाने घेतलेली बिनव्याची सुरक्षा ठेव, भाडे आणि खर्च वजा करून परत करावी लागणार तसेच घरमालकाने सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यास कसूर केल्यास व्याजसह रक्कम देण्याचे आदेश न्यायालय देऊ शकणार
९) घराच्या मालकीबाबत प्रश्न उध्दभवल्यास तसेच घरमालकाच्या मृत्यू झाल्यास घरभाडे कोणास द्यावे हा प्रश्न उद्धवल्यास भाडेकरू घरभाडे भाडे अधिकाऱ्याकडे जमा करू शकणार 
१०) भाडेकरूने घरातील किरकोळ देखभाल व दुरुस्तीचे काम न केल्यास घरमालक ते काम करून घेऊ शकेल व त्याचा खर्च सुरक्षा ठेव रक्कमेतून वसुल करू शकणार आहे 
११) भाडे अधिनियम अस्तित्वात आल्यावर भाडेकरार संबंधित सर्व दावे भाडे न्यायालयातच चालणार दिवाणी न्यायालयात अथवा इतर कोणत्याही न्यायालयात चालवले जाणार नाहीत
१२) घरमालक मिळकतीच्या देखरेखीसाठी मिळकत व्यवस्थापक नेमू शकेल जो भाडेपावती देऊन भाडे गोळा करणे, दुरुस्तीचे काम करणे, मिळकतीचे परीक्षण करणे, भाडेकरूला नोटीस देणे, आधी कामे करू शकेल. 
१३) घरमालक अथवा मिळकत व्यवस्थापक भाडेकरूला २० तासांची नोटीस देऊन घरात प्रवेश करू शकतील. घराची पाहणी करू शकतील. दुरुस्ती करू शकतील. (सदर घरात प्रवेश करण्याबाबतचा नियम वादादीत होऊ शकतो. अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण करू शकतो.)
१४) घरमालक भाडेकरूची मूलभूत व अत्यावश्यक सेवा बंद करू शकनार नाही. 
१५) भाडेकरूंवर  घर सुव्यवस्थित, सुस्थितीत  ठेवण्याची जबाबदारी असणार. 

Click here for any Legal advice.

घरमालकाने स्वतःच्या खर्चाने करावयाची कामे  

१. भाडेकरूने केलेल्या नुकसानीमुळे करणे भाग असेल त्याखेरीज अन्य संरचनात्मक दुरुस्त्या.
२. भिंतींची रंग सफेदी आणि दारे व खिडक्यांचे रंगकाम,
३. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा, नळपाईप बदलणे व नळकाम करणे.
४. आवश्यकतेनुसार अंतर्गत व बाह्य विद्युतविषयक तारकाम आणि संबंधीत परिरक्षण

Recommended for you: Bye-Laws amendments for housing society disputes resolutions

 

भाडेकरूने स्वखर्चाने करावयाची कामे. 

१. वॉशर्स तोटी व तोट्या बदलणे.
२. जलनिस्सारण स्वच्छता.
३. शौचस्थान दुरुस्ती.
४. धावन कुंडी दुरुस्ती.
५. स्नान टब दुरुस्ती.
६. गिझर दुरुस्ती,
७. परिपथ वियोजक दुरुस्ती.
८. स्वीच व खोबण दुरुस्ती.
९. मोठ्या अंतर्गत व बाह्य तारा बदल करण्याखेरीज विद्युतविषयक साधनसामग्रीची दुरुस्ती व पुनः स्थापन.
१०. स्वयंपाकघरातील खिळण्यांची दुरुस्ती.
११. दरवाजे, कपाटे, खिडक्या, इत्यादींचे कळ व कुलपे यांचे पुनःस्थापन.
१२. माशांच्या जाळ्यांचे पुन:स्थापन.
१३. खिडक्या, दरवाजे, इत्यादींच्या तावदानाचे पुनःस्थापन.
१४. भाडेकरूस भाड्याने दिलेल्या किंवा तो वापरत असलेल्या उद्यानांची व
१५. मोकळ्या जागांची देखभाल.

FORM FOR INFORMATION OF TENANCY

आपल्या प्रतिक्रिया कळवा

श्री युवराज उत्तम पवार
संस्थापक अध्यक्ष
डिअर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन

contact@dearsociety.in 

#WeRunSocieties 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here