मृत्युपत्र मनशांतीसाठी करावे.

4
1536

आपल्या मृत्यू पाश्च्यात आपल्याच आत्म्याला शांती लाभावी, यासाठी मृत्युपत्र हे एक प्रयोजन आहे. आपल्या संपत्तींवर आपल्याच प्रिय व्यक्तींचा हक्क अबाधित रहावा. त्यांना सुखासुखी संपत्तींचे हक्क प्राप्त व्हावेत, कोणी धूर्त नातेवाईक आपल्या संपत्तीवर डल्ला मारण्यास टपून बसलेला आहे हे आपल्या लक्षातही येत नाही आणि मग आपल्या प्रिय जणांना आपल्याच संपत्तीवरील हक्क संपादनासाठी वणवण होते. हि  वणवण टाळायची असेल तर मृत्युपत्र नक्कीच करून ठेवले पाहिजे.  मृत्यूच्या पश्चात स्वकष्टार्जित मालमत्तेचा वारसदार नेमण्यासाठी केलेला दस्तऐवज म्हणजे मृत्युपत्र. मृत्यूच्या पश्चात आपली स्वकष्टार्जित मालमत्ता कोणाच्या ताब्यात द्यावी हे ठरवण्याचा अधिकार कायद्याने आपल्याला दिला आहे. भारतीय वारसा कायदामध्ये मृत्युपत्राबद्दल तरतूद दिलेली आहे.

 

मृत्युपत्र कसे करावे?

मृत्यपत्र हा कायदेशीर दस्तऐवज असून लिखित स्वरूपात असावा. मृत्युपत्रातील मजकूर मृत्युपत्र करणाऱ्याची इच्छा स्पष्टपणे कळेल असा असावा. मृत्यपत्र करणारी व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचा वैद्यकीय दाखला असावा. मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीने दोन साक्षीदारांसमोर त्यावर सही करावी. तसेच, काही कारणामुळे मृत्युपत्र बदलायचे झाल्यास तशी मुभा देखील कायद्यात आहे. परंतु, सर्वात शेवटचेच मृत्युपत्र हे ग्राह्य धरण्यात येते. मृत्युपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकाची नेमणूक देखील करता येते. कायद्याने मृत्युपत्राची नोंदणी बंधनकारक नाही. परंतु, मृत्युपत्राची अंमलबजावणी करताना कोणताही वाद उत्पन्न झाल्यास अनोंदणीकृत पेक्षा नोंदणीकृत मृत्युपत्राची वैधता सिद्ध करणे तुलनेने सोयीचे असते.

मृत्युपत्र कधी आणि कोणी  करावे?

स्वकष्टाने संपत्तीअर्जन सुरु केले, कि मृत्युपत्र करावे. कोणत्याही कल्पनांना बळी न पडता शारीरिक व मानसिक स्थिती सक्षम असतानाच मृत्युपत्र करावे. एकाद्या व्यक्तीने मृत्युपत्र केल्यानंतरही ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत संपत्तीवर त्याचाच अधिकार राहतो.  जी सज्ञान, मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे ती व्यक्ती मृत्युपत्र करून शकते. ज्यांच्याजवळ संपत्ती, मालमत्ता आणि जीवन विमा आहे अश्यांनी मृत्युपत्र करावे. वारसदार असल्यास वारासदारांमध्ये संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वारसदार नसल्यास इतर कोणत्याही ट्रस्ट अथवा संस्थेला मृत्यूपश्चात संपत्तीचे हक्क प्रदान करण्यात येऊ शकतात.

मृत्युपत्र आणि नॉमिनेशन मधील फरक:

मालमत्तेमध्ये नॉमिनेशन दिलेले आहे त्यामुळे मृत्युपत्र बनवण्याची गरज नाही असा गैरसमज असतो. परंतु, नॉमिनी हा केवळ विश्वस्त असून त्यास मालकी हक्क मिळत नाहीत. नॉमिनेशन हि केवळ तात्पुरती सोय असून मृत्यूनंतर केवळ मृत्युपत्रानेच मालमत्तेचे व्यवस्थापन होऊ शकते.

मृत्युपत्राचे प्रकार:

मुख्यतः मृत्युपत्राचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे विशेषाधिकार असलेले आणि दुसरे विशेषाधिकार नसलेले. विशेषाधिकार असलेले मृत्युपत्र हे युद्धात किंवा मोहिमेवर असलेले सैनिक किंवा वैमानिक यांचे अनौपचारिक मृत्युपत्र असते. विशेषाधिकार मृत्युपत्रासाठी कोणत्याही औपचारिकता पूर्ण करण्याची गरज नसते, तर विशेषाधिकार नसलेल्या मृत्युपत्रासाठी सर्व कायदेशीर नियमाचे पालन करणे आवश्यक असते.

मृत्युपत्र केल्याचे दुष्परिणाम:

आई आणि बाबाना ताई आणि दीदी अशा दोन मुली आणि सर्वात लहान बच्चू नावाचा १ मुलगा होता. सर्व विवाहित. बच्चूला एक मुलगा आहे. बच्चू मल्टीनॅशन कम्पनित कामाला होता लवकरच उत्तम मालमत्ता खरेदी केली. काळानंतरने बाबा वारले, दुर्दवाने बच्चूचे अपघाती निधन झाले. बच्चूच्या सर्व स्वकष्टअर्जित मालमत्तेवर वारस नोंद करताना आईचे नाव बच्चूचा वारस म्हणून लागले गेले. आता आईचे निधन झाल्यावर आईचे वारस म्हणून ताई आणि दीदीचे नाव लावण्याचा वाद सुरु झाला. खरं तर बच्चूच्या स्वकष्टअर्जित संपत्तीत बहिणीचा काहीही नैतिक अधिकार नाही. संपत्ती माणसाची मती भ्रष्ट करते. आजही बच्चूच्या पत्नी आणि मुलाला संपत्तीचा सुखासुखी उपभोग घेता येत नाही.

असंच आणखी एक उदाहरण आहे. आईबाबाना आकाश,  विशाल आणि बबन असे ३ मुलगे त्यापैकी आकाश आणि विशाल सरकारी नोकरीत तर बबन आई वडिलांजवळ राहिला. दोन मुलगे चांगले कमावतात, त्यांच्याकडे उत्पन्नाचे चांगले साधन आहे. परिणामी वडिलांनी सर्व सहमतीने स्वकष्टअर्जित मालमत्ता बबनच्या नावावर केली. वडिलांचे निधन झाले. काही वर्षांनी बबनचेहि निधन झाले. बबनला एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.  बबनच्या निधनानंतर कपटी आणि धूर्त भावाने  ८५ वर्षाच्या अंथरुणावर खिळलेल्या आईचे नाव बबनचा वारस म्हणून लावले. आकाशचे म्हणणे होते की, बबनला एकच मुलगी आहे, तिला काय करायची इतकी संपत्ती? आईच्या निधनानंतर इतर वर्षांची नाव लागतील हक्क मिळतील. आज कोर्ट कचेऱ्या सुरु आहेत.

परंतु, त्या व्यक्तीने मृत्युपत्र केले असते तर हि परिस्थिती उदभवली नसती.

 

#WeRunSocieties

 

 

4 COMMENTS

  1. Hi! This is my first visit to your blog! We are a collection of volunteers and starting a new project in a community in the same niche. Your blog provided us useful information to work on. You have done a extraordinary job!

  2. Good day I am so excited I found your website, I really found you by mistake, while I was browsing on Aol for something else, Nonetheless I am here now and would just like to say thank you for a incredible post and a all round interesting blog (I also love the theme/design), I don’t have time to look over it all at the moment but I have saved it and also added your RSS feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the great work.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here