सहकारी गृहनिर्माण संस्थांची थकबाकी वसुल!

6
26858
Recovery of dues in Societies

राज्यात एक लाख दहाहजार पेक्षा अधिक नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. थकबाकीदार सभासद ही अनेक सोसायटीजमधील डोकेदुखी आहे अशी भावना पदाधिकाऱ्यांनी करून घेतलेली असते. सहकारी गृहनिर्माण संस्थांची थकबाकी वसूल करणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. थकबाकी वसुली कशी करावी ते या लेखाच्या माध्यमातून पाहू.  नियमांचे पालन न करता थकबाकीबाबत रडत बसणारे कुचकामी पदाधिकारी त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यांची पदावरून हकालपट्टी तात्काळ केली पाहिजे.

थकबाकी वसुलीसाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

सभासदांना बील/मागणी पत्र पाठवणे:

संस्थेच्या सचिवाने संस्थेच्या शुल्काबाबतचे बील/मागणी पत्र संस्थेचे सचिव उपविधी क्र. ६७(अ) च्या आधारावर तयार करून समितीने निश्चित केलेल्या तारखेला किंवा त्याअगोदर सर्व सभासदांना ते पाठवले पाहिजे. मागणीपत्र दर महिन्याला सभासदांना पाठवले पाहिजे.

 

सभासदांना बील/मागणी पत्रांनुसार देय रक्कम संस्थेला देणे:

संस्थेच्या प्रत्येक सभासदाने समितीने निश्चित केलेल्या अशा कालावधीत बिलात/मागणी पत्रात उल्लेखिलेल्या रकमेचा संपूर्ण भरणा केला पाहिजे. देय दिनांकापासून 3 महिन्याच्या अंत देय रक्कम अदा न केल्यास संबधित संभासदास थकबाकीदार घोषित करून कायदेशीर कारवाई सुरू केली पाहिजे. एखाद्या सभासदाने मागणी नोटिशीत, बिलात उल्लेखिलेल्या प्रमाणे संस्थेच्या आकारणीचा भरणा केला नाही तर अशा सभासदाने संस्थेची आकारणी भरण्यास कसूर केली आहे असे समजण्यात येते. संस्थेची आकारणी करण्यात कसूर झाल्याची प्रकरणे त्यावर जरूर ती पुढील कारवाई करण्यासाठी संस्थेच्या सचिवाने समितीच्या नजरेस आणली पाहिजे.

This video might help you:

थकबाकीदारांची यादी तयार करणे :

संस्थेच्या सचिव अथवा खजिनदाराने थकबाकीदार सभासदांची यादी तयार केली पाहिजे. व समितीच्या सभेत चर्चेसाठी मांडली पाहिजे. समितीने पहिले नोटिस पाठवण्याबाबत निर्णय घ्यावा.

थकबाकी भरण्याबाबत पहिले नोटिस पाठवणे :

अधिक कायदेशीर बाबींचा उलेख न करता थकबाकीदार संभासदाना थकीत रक्कम भरण्याबाबत विनंती करावी. निधी अभावी संस्थेचा कारभार चालवणे अवघड असल्याबाबत कळवावे.

 

थकबाकीदार संभासदाना फोन करणे,

भेट देणे व संस्थेचे देणे चुकते न करण्याचे कारण जाणून घेणे: अनेकदा सभासदांना देणे चुकते करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक अडचणीमुळे शक्य होत असते, समस्येचे मुळ जाणून घेणे हे समितीची जबाबदारी आहे. सभासदांची काही तक्रार असल्यास त्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न करावा. परंतु आडमुठेपणा करणाऱ्या संभासदांच्या मागण्याना बळी पडू नये.

सहसंभासदाना थकबाकीबाबत कळवणे:

सदनिका एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावावर असल्यास थकबाकी भरण्याबाबत सहसंभासदाना कळवावे.

थकबाकीदार असल्याबाबत ठराव मंजुर करून अंतिम नोटिस पाठवणे:

सभासदाने मागणी पत्रातील रक्कम देय दिनांपासून पुढील 3 महिन्यात चुकती न केल्यास समितीच्या सभेत संबंधित सभासद थकबाकीदार झाला अस्लयाबाबत ठराव मंजुर करावा. अशा सर्व थकबाकीदार सभासदांची यादी नोटिस बोर्डावर लावावी. व सर्व सभासदांना सदर यादी पोचवावी.

अंतिम नोटिस पाठवणे :

खर तर अंतिम नोटिस न पाठवता वसुलीची कायदेशीर कारवाई सुरू केली जाऊ शकते. परंतु एक अंतिम प्रयत्न म्हणून थकबाकीदार सभासदाला अंतिम नोटिस पाठवावी. सभासदाकडून येणे असलेली सर्व प्रकारची रकम, दंडव्याज आदींचा उलेख करावा. यापूर्वी समितीने पाठवलेले मागणीपत्र संदर्भ द्यावा. तसेच सहकार कायद्यातील कलम १५४ब (२९) अन्वये कठोर कारवाई करण्यास बाध्य न करण्याबाबत विनंती करावी.

 

वसुली दाखल्यासाठी निबंधकाना प्रस्ताव दाखल करणे:

सर्व प्रयत्न करून झाल्यावरसुद्धा जर सभासद थकीत रक्कम देण्यात तयार नसेल तर वसुली दाखल्यासाठी निबंधकाना अर्ज दाखल केला पाहिजे. यात समितीने कसूर करता काम नये. अन्यथा थकबाकीदार सभासदांचे अधिक फावते. वसुली दाखल्यासाठी करावयाच्या अर्ज व त्यासोबत जोडाव्याची कागदपत्र खालील प्रमाणे

१. विहित नमुन्यातील दावा अर्ज
२. अर्जा सोबत रु. 100/- चा मुद्रांक
३. थकबाकीदार सभासद झाल्याबाबतचा दिनांकाचा पुरावा।
४. खाते उतारा, प्रामाणित प्रती 3
५. अंतिम नोटीस पाठवल्याचा पुरावा।
६. दाव्यास संस्थेच्या वतीने हजर राहणाऱ्या प्राधिकृत व्यक्तीबाबत ठराव।
७. व्याजाबाबत ठराव केला असल्यास ठरावाची प्रत
८. थकबाकीदारावर 154 ब 29 (पूर्वीचा 101) अन्वये कारवाई करण्याबाबतचा ठराव
९. व्याजव्यतिरिक बाबवार रक्कम तपशील।
१०. चौकशी फी चलन शासकीय कोषागारात भरणा पावती।

या पद्धतीने वसुली करण्याची कार्यवाही केल्यास एकाही सहकारी गृहनिर्माण संस्थेत थकीत सभासद उरणार नाही. सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधीनुसार चालावी यासाठी डिअर सोसायटीचे मोबाइल Application  अत्यंत उपयुक्त आहे.

 

#WeRunSocieties

6 COMMENTS

  1. I’ll right away take hold of your rss feed as I can’t to find your e-mail subscription link or newsletter service. Do you’ve any? Please permit me realize in order that I could subscribe. Thanks.

  2. Hi, I think your blog might be having browser compatibility issues. When I look at your blog in Ie, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, awesome blog!

  3. जर एखादा फ्लॅट बिल्डरकडेच असेल आणि तो जर मेंटेनन्स भरत नसेल आणि म्हणत असेल की माझा फ्लॅट विकल्यानंतरच मी मेंटेनन्स भरेल दोन वर्षाचा पेंटिंग मेंटेनन्स आहे त्यासाठी काय करावे आहे का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here