कार पार्किंगबाबत बोलू काही!

8
8686
कार पार्किंग
Read in English

 

गृहनिर्माण प्रकल्पात कार पार्किंग हा खूपच जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे. घर घेताना पार्किंग घेणे जणु अनिवार्य झाले आहे. पार्किंगच्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे लाखो सदनिकाधारकांची वर्षानुवर्षे बिल्डर फसवणूक करत आले आहेत. पार्किंगवरून गृहनिर्माण संस्थेत वाद होणे नित्याचे झाले आहे. सदनिकाधारक आपसात भांडत बसतात मात्र फसवणूक करणाऱ्या बिल्डरला मोकाट सोडतात. पार्किंगबाबत अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला जागृत करून जाईल.

कार पार्किंगची बिल्डरला विकण्याचा अधिकार आहे का?

नाही. मोकळे आणि खुले पार्किंग विकण्याचे अधिकार बिल्डरला नाहीत.पोडियम पार्किंग  बिल्डिंगच्या खालील ज्याला स्टील्ट पार्किंग किंवा कव्हर्ड पार्किंग म्हंटले जाते ती सुद्धा विकण्याचा अधिकार बिल्डरला नाही.

बिल्डर कोणते पार्किंग विकू शकतो?

ज्या पार्किंग मध्ये FSI (चटई क्षेत्र) वापरला असेल ते पार्किंग विकता येते. असे पार्किंग तिन्ही बाजूने बंदिस्त व वरून छप्पर असते.केवळ असेच पार्किंग विकण्याचा अधिकार बिल्डरला आहे.

बिल्डरने करारनामा व सूची दोन मध्ये कव्हर पार्किंग उल्लेख केला असेल तर असा पार्किंग व्यवहार कायदेशीर आहे का?

पार्किंग विकता येत नसल्याने बिल्डर केवळ  ‘कव्हर पार्किंग’ असा उल्लेख  करारनामा व सूची दोन मध्ये करतात. सदनिकाधारकाची दिशाभुल करून पैसे उकळण्यासाठी असा संदिग्ध उल्लेख करारनाम्यात केला जातो. पार्किंगचा उल्लेख ज्यांच्या करारनाम्यात असेल आणि त्यासाठी बिल्डरने रक्कम आकारली असेल तर ती रक्कम परत मिळवण्यासाठी बिल्डरला नोटीस पाठवून नंतर वेळप्रसंगी ग्राहक न्यायालयात दाद मागितली पाहिजे. अशा प्रकारच्या उल्लेखामुळे कोणत्याही सदनिकाधारकाला पार्किंगवर मालकी अधिकार दाखवता येत नाही. संस्थेने अशा पार्किंगच्या डाव्यांची दखलसुद्धा घेऊ नये असे उच्च न्यायालयाचे एका न्यायनिवाड्यात नमूद केले आहे.तसेच बेकायदेशीररित्या पार्किंग विकणाऱ्या बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक माहितीसाठी

पार्किंग विकण्याचे अधिकार गृहनिर्माण संस्थाना आहेत का?

पार्किंग विकायचे अधिकार कोणासही नाहीत. पार्किंगचे संपूर्ण व्यवस्थापन, देखभाल दुरुस्ती व नियोजन हि  गृहनिर्माण संस्थाची जबाबदारी आहे.आदर्श उपविधी क्रमांक ७८ ते ८४ नुसार गृहनिर्माण संस्था पार्किंगबाबत सर्व कार्य करू शकतात जसे. वाहनतळाच्या मोकळ्या जागा आणि स्टील्ट वाहनतळाचे वाटप धोरण, वापरावरील निर्बंध, वाहनतळ चिन्हांकित करणे, वाहनतळ वाटपाची पात्रता, वाहनतळ शुल्क आकारणी असे सर्व अधिकार गृहनिर्माण संस्था व सर्वसाधारण सभेला आहेत.

गृहनिर्माण संस्थांनी पार्किंगचे वाटप कसे करावे?

पार्किंग वाटप तीन प्रकारे करता येते. चिट्ठ्या टाकून (लॉटरी) पद्धतीने किंवा लिलाव पद्धतीने किंवा प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम वाटप, संस्थेने स्वतःचे पार्किंगचे धोरण बनवले पाहिजे, पार्किग धोरण बनवणे आणि त्यात बदल करण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेला आहेत. गृहनिर्माण संस्था या सभासदांच्या हितासाठी कार्य करत असतात. पार्किंग वाटपाचा पहिला निकष म्हणजे ज्याच्याकडे स्वतःची कार असेल त्यासच पार्किंग वाटप होईल तसेच जो सदनिकाधारक त्याच्या सदनिकेत राहत असेल त्यास प्रथम पार्किंग वाटप केले जाईल त्यानंतर इतरांना पार्किंग वाटप केले पाहिजे. सर्वांना पार्किंग वाटप झाल्यावर जर जागा शिल्लक असेल तर ज्यांच्याकडे दुसरी कार आहे त्यांना वाटप केले पाहिजे. विकास नियंत्रण नियमानुसार पाहुणे वाहनतळ (व्हिजिटर पार्किंग) असणे अनिवार्य आहे.

रेरा: रिअल इस्टेट आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सोसायटी आणि फ्लॅट खरेदीदारांसाठी एक कायदेशीर उपाय

ज्यांनी पार्किंग बिल्डरकडून विकत घेतली त्यांचे बहुमत आहे मग न्याय कसा मिळणार?

गृहनिर्माण संस्थेने उपविधीतील तरतुदीनुसार पार्किंगचे वाटप केले पाहिजे. पार्किंग वाटपाचे सर्वांधिकार सवर्साधारण सभेला असतात. परंतु उपविधी आणि कोणत्याही कायद्याचे विरुद्ध ठराव संमत करणे बेकायदेशीर आहे. जर पार्किंग बाबत बहुमताच्या जोरावर बेकायदशीर आणि अन्यायकारक ठराव संमत केला गेला तर सहकार न्यायालयात दाद मागता येते. तसेच अशा बेकायदेशीर ठराव संमत करणाऱ्याविरोधात फौजदारी कारवाई सुद्धा केली जाऊ शकते.

जितक्या सदनिका तितक्या पार्किंग देणे बिल्डरवर बंधनकारक आहे का?

असे कोणतंही बंधन नाही. मंजूर बांधकाम आराखडण्यात विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार पार्किंग मान्यता मिळत असते. बिल्डर बेकायदेशीर रित्या पार्किंग चिन्हांकित करून विकतात. बिल्डरकडे पार्किंग वाटपाचा हट्ट धरू नये. बिल्डरने केलेले पार्किंग वाटप सदनिकाधारकांची संघटना स्थापन झाली कि निरस्त आणि रद्द ठरते.

रेरा अंतर्गत पार्किंगशी संबंधित नियम

#WeRunSocieties

1. Website – https://dearsociety.in/
2. Instagram – https://instagram.com/dearsocietymh?igshid=NmE0MzVhZDY=
3. LinkedIn – https://www.linkedin.com/company/dear-societyin/
4. Facebook – https://www.facebook.com/dearsocietyMH?mibextid=ZbWKwL
5. YouTube – www.youtube.com/dearsociety/featured?sub_confirmation=1 https://www.facebook.com/dearsocietyMH?mibextid=ZbWKwL

 

8 COMMENTS

  1. हरि:ॐ
    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले आभार . आपला ऑफिसचा पत्ता मिळाला असता तर प्रत्यक्षात भेटता आले असते . धन्यवाद .

    • Headquarters:
      A Wing, 72-73, KK Market, Dhankawadi, Pune, Maharashtra 411043

      Mumbai Branch:
      Sector 11, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra 410210

      PCMC Branch:
      Office 613, Kolte Patil City Avenue Bengaluru – Mumbai Hwy, Shankar Kalat Nagar, Wakad, Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra 411057

  2. सर आमची सोसायटी शाहूनगर चिंचवड येथे आहे व ती MIDC प्लॉटवर आहे बिल्डिंग बांधताना बिल्डर हा सेक्रेटरी होता प्लॅन सक्शन करून बिल्डिंग बांधली व नंतर तळमजल्यावरील 2 फ्लॅट चे दुकानगाळे काढून विकले त्यात त्याचा एक गाळा आहे व त्या गाळ्याला त्यांनी सोसायटी च्या मोकळ्या जागेत बांधलेले 2250sq ऑफिस अलोटमेंट करून घेतले आहे व तो आता वापरत आहे ऑफिस व गाळे प्लॅन मध्ये नसताना विकले आहेत त्यामुळे बिल्डिंग ला कपलिशन मिळत नाही व आता नवीन कमिटी आल्यावर हे सर्व समजले आहे आता ती व्यक्ती कमिटीवर नाही तर आम्ही काय ऍक्शन घेऊ शकतो सोसायटी ने अलोटमेंट केलीली मोकळी जागा रद्द करू शकते का यावर मार्गदर्शन करावे

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  3. नमस्कार जर बिल्डर ने डीड ऑफ apartment मध्ये
    Parking allotted to each flat owner असे लिहून दिले असेल व parking चे amount घेतली नसेल v सांगितले की तुम्ही कुठेही सर पर करा तर allotted parking असे का लिहून दिले
    हे समजत नाही.

  4. सोसायटी मालका पेक्षा दुप्पट किंवा तिप्पट दराने पार्किंग ची रक्कम भाडेकरू कडून घेवू शकतात का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here