थकीत रक्कमेवर व्याज आकारणी कशी करावी ?

6
7661
READ IN ENGLISH

सोसायटीच्या सभासदाने वर्गणी (मेंटेनन्स) वेळेत न दिल्यास सोसायटीने थकीत रक्कमेवर व्याज आकारणी कशी केली पाहिजे?
डिअर सोसायटी सॉफ्टवेअर आणि मोबाईल अँप हे काम आपोआप कसे करते?

उत्तर:- उपविधी क्रमांक ७१/71 नुसार सभासदास त्यांच्या संस्थेला थकीत असलेल्या देय रक्कमेवर दरसाल २१% दराने किंवा सर्वसाधारण सभेने निश्चित केलेल्या दराने ( २१% पेक्षा अधिक व्याज आकारता येत नाही ) थकविल्याच्या दिनांकापासून त्या रकमेचा भरणा होईपर्यंतच्या कालावधीसाठी सरळ व्याज आकारता येते. सूत्र पुढील प्रमाणे :
थकीत रक्कमेवरील व्याज = थकीत मुद्दल * व्याजदर% * (थकीत दिवस/३६५)

वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ.
प्रिय सोसायटीची

बिल दिनांक: ०१ एप्रिल     बिल भरण्याचा शेवटचा दिनांक: १० एप्रिल   मासिक वर्गणी : १०००/-

Bill Date: 01-Apr        Bill Due Date: 10-Apr             Monthly Bill Amount: 1000/-

Payment before due date/
वर्गणी विहित वेळेत भरल्यास
Unit A/101 has paid Bill of 1000/- on 10th April. In  this case no interest is added and May month bill will be of regular amount only.
सदनिका क्रमांक A/१०१ च्या सभासदाने १ एप्रिलचे रुपये १०००/- चे बिल १० तारखेला भरले. परिणामी व्याज आकारण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मे महिन्याचे चे बिल नियमित रक्कमेचे निघणार
Payment after Due date/
देय दिनांकानंतर वर्गणी भरल्यास
Unit A/102 has paid Bill of 1000/- on 25th April. In this casepayment has been delayed by 15 days.
Interest will be Calculated as mentioned below:
Interest on Dues =
Dues * ROI * (Delay Days/365)= 1000*(21/100)*(15/365) = 8.63 = 9(Rounded Off)
May Month Bill will generated as = Rs 1009 
सदनिका क्रमांक A/१०२ च्या सभासदाने २५ तारखेला संपूर्ण रक्कम रुपये १०००/- भरले. त्यामुळे ११ एप्रिल ते २५ एप्रिल अशा १५ दिवस उशिरा बिल भरले.
खाली पद्धत आकारून व्याज काढता येते.व्याज = १०००*(२१/१००)*(१५/३६५) = ८.६३ = रुपये ९ (पूर्णांकात)
म्हणजेच मे महिन्याचे बिल एकूण = १००९/-
No Payment till Next Bill/
देय वर्गणी न भरल्यास
Unit A/103 has not paid April’s month Bill.

Interest will be Calculated as mentioned below:
Interest on Dues =  1000*(21/100)*(20/365) = 11.50 = 12(Rounded Off)

May Month Bill will generated as = Rs 2012

सदनिका क्रमांक A/१०३ च्या सभासदाने १ एप्रिलचे रुपये १०००/- चे बिल भरलेच नाही. एप्रिल महिन्यात एकूण ३० दिवस असतात. सभासदाकडून ११ एप्रिल ते ३० एप्रिल एकूण २० दिवसाचे व्याज वसूल केले पाहिजे.
व्याज = १०००*(२१/१००)*(२०/३६५) = ११.५०/- = १२ (पूर्णांकात) मे महिन्याच्या बिल पुढीलप्रमाणे असेल = एप्रिल महीन्याची मासिक वर्गणी + देय व्याज + मे महीन्याची मासिक वर्गणी = १०००+ १२ + १००० = रुपये २०१२/- रुपयांचे बिल आकारले पाहिजे.
Partial Payment before Due date/
देय वर्गणी अंशतः भरल्यास
Unit A/104 has paid 500 rs before 10th Apr. So remaining dues are 500 rs.

Interest will be Calculated as mentioned below:
Interest on Dues =  500*(21/100)*(20/365) = 5.75 = 6(Rounded Off)
May Month Bill will generated as = Rs 1506

सदनिका क्रमांक A/१०४ च्या सभासदाने केवळ ५००/- रुपये १० एप्रिलपूर्वीच भरले. म्हणजेच  उर्वरित ५००/- रुपये रुपयांवर सभासदाकडून ११ एप्रिल ते २५ एप्रिल एकूण २० दिवसाचे व्याज वसूल केले पाहिजे.

थकीत रक्कमेवरील व्याज = थकीत मुद्दल * व्याजदर * (थकीत दिवस/३६५) = ५००(२१/१००)(२०/३६५) = रुपये ५.७५ = रुपये ६

म्हणजेच मे महिन्याच्या बिल एकूण = एप्रिल महीन्याची मासिक वर्गणी + देय व्याज म्हणजेच + मे महीन्याची मासिक वर्गणी = ५००+ ६ + १००० = रुपये १५०६/- रुपयांचे बिल आकारले पाहिजे.


 

1. Website –     https://www.dearsociety.in/
2. Instagram –  https://instagram.com/dearsocietymh?igshid=NmE0MzVhZDY=
3. LinkedIn –    https://www.linkedin.com/company/dear-societyin/
4. Facebook –   https://www.facebook.com/dearsocietyMH?mibextid=ZbWKwL

6 COMMENTS

      • In our society they calculate interest every month and show the interest as monthly due and add it to the maintenance amount and again charge interest on total in next month , it is legally correct?

        E.g. 1000 rs per months maintenance. Apr and May no maintenance paid. In Jun the calculation is done this way,

        Due in Apr: 1000 + 16.43 ( 20% PA on 1000)
        Due in May: 1017 + 1000 + 49.57(20% PA on 2017)

  1. Its like you read my mind! You appear to know a lot about this, like you wrote the book in it or something. I think that you could do with a few pics to drive the message home a little bit, but other than that, this is great blog. A great read. I’ll certainly be back.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here