सोसायटी स्तरावर तक्रार निवारण करण्यासाठी उपविधीत काय सुधारणा करावी?

13
4426
गृहनिर्माण संस्था तक्रार निवारण
Read in English

 

तंटा मुक्ती समिती किंवा गृहनिर्माण संस्था तक्रार निवारण समिती

अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला सभासद कंटाळलेले असतात. सभासदांना निबंधकांकडे तक्रार करण्यासाठी वेळ नसतो.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १३ अनुसार उपविधी सुधारणा करता येते.

अशा वेळी वेळेची बचत व्हावी. संस्थेतच समस्येचे समाधान व्हावे. संस्थेचे वातावरण तंटामुक्त असावे, यासाठी उपविधी सुधारणा करून खालील गोष्टीचा समावेश उपविधीमध्ये करावा.

उपविधी क्रमांक १७४ मध्ये खालील मजकूर समाविष्ट करावा.

१७४: समितीकडून कळविण्यात आलेल्या निर्णयाने संबंधित सभासदाचे समाधान झाले नाही किंवा १५ दिवसात, समितीकडून कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यात आला नाही तर संस्थेच्या सभासदांना संस्थेच्या सर्वसाधारण सभेने गठीत केलेल्या तक्रार निवारण व सल्लागार समितीकडे गाऱ्हाणे मांडता येईल. अशा समितीच्या रचना व अधिकार सर्वसाधारण सभेने ठरविलेल्याप्रमाणे असतील.

उपविधी क्रमांक १७४अ हे वाढीव कलम खालील मजकूरासह समाविष्ट करावे.

१७४अ : तक्रार निवारण व सल्लागार समिती
“सर्वसाधारण सभेत संस्थेच्या तीन क्रियाशील सभासदांची मिळून समिती नियुक्त करण्यात येईल. सदर समितीत समिती सदस्य नियुक्त करता येणार नाहीत. सदर समितीचे अध्यक्ष हे नियुक्त सदस्यांपैकी जेष्ठ सदस्य असतील. अशा सल्लागार समितीच्या निर्णयाने संबंधित सभासदाचे समाधान झाले नाहीत तर तक्रारीच्या स्वरूपाप्रमाणे सभासद खालील प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधू शकतात.”

उपविधी सुधारणेसाठी सर्वसाधारण सभेला उपस्थित सभासदाच्या २/३ इतक्या बहुमताने मान्यता घेणे आवश्यक असते व त्यानंतर निबंधकांनी त्यास मान्यता दिल्यावर उपविधी लागू होतात.

या सल्लागार समितीमुळे अनेक संस्थातर्गत समस्या निकाली निघू शकतात, वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होऊ शकते. शांती आणि सुखाने रहिवासी करणे साकार होऊ शकते.

अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. युवराज (दादासाहेब) पवार
अध्यक्ष,
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन, पुणे शाखा.
९८९०७१२२१७

गृहनिर्माण संस्थे संबंधित सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे येथे मिळतील :

13 COMMENTS

  1. 90% सोसायटी सभासद जर काही ना काही कारणास्तव मेंटेनन्स जमा करत नसतील तर काय करावे.

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

      • आमच्या सोसायटी च्या अध्यक्ष्यांनी सोसाइटी मधील गाळा खरीदी केला असल्याने व गाला जरा खाली म्हणजेच रोड वरुण नीट दिसत नसल्याने अध्यक्षानी आमच्या सोसायटी ची सुरक्षतेसाठी होत तेच लोखंडी कंपाउंड काडून टाकले आहे तरी यावर कायतारी मार्ग सुचवावा 🙏

        • सविस्तर चर्चा आवश्यक आहे. तुमच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन मीटिंग सुद्धा शेड्यूल केली जाऊ शकते. appointment साठी संपर्क 9175733957, धन्यवाद!

  2. सौ. कांचन पांडुरंग भोईर व पांडुरंग हेंदर भोईर
    मंगेशीसिटी फेज 1 मुरलीकुंज 603 कोळीवली रोड
    कल्याण पश्चिम

    विषय – *आमची पूर्व परवानगी न घेता चौकीदार कडून घरची चावी घेऊन घर उघडले*

    आम्ही वरील पत्त्यावर रहात असून आज दिनांक 16/03/2023 रोजी सोसायटीच्या अध्यक्षाने चौकीदारा कडून चावी घेऊन अध्यक्षाने व ऑडिट टीमने आमच्या अनुपस्थितीत घर उघडले.

    त्या नंतर भिंती चेक करण्यासाठी कपाट उघडली

    या सदनिकेत आम्ही 2016 पासून राहत आहे सोसायटी नेहमीच मनमानी करभार करत असते.

    आपला विश्वासू
    सौ. कांचन पांडुरंग भोईर व पांडुरं हेंदर भोईर

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  3. संपर्क करून आमच्या सोसायटी. मधील जे मुद्दे आहेत ते शेअर करायचे आहेत आणि उपाय काय आहे त्या बद्दल सल्ला हवा आहे.
    8080141274
    शेखर सावंत देसाई
    नवी मुंबई

  4. आमच्या को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील सचिवांचे म्हणणे आहे की सोसायटीतील दप्तर भिजून नष्ट झाले. अशा वेळी सचिवांनी काय करण्याची कायद्यात तरतूद आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here