अध्यक्ष, खजिनदार, सचिवांचे बालिश राजीनामा अस्त्र!

12
28200

तुमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वाचायला द्या!

गृहनिर्माण संस्थाचे पदाधिकाऱ्यांची राजीनामा देण्याची बालिश कृत्य करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ज्या पदाधिकाऱ्याला पदाचा राजीनामा कसा द्यायचा?, पदाच्या जबाबदारीतून मुक्तता कधी आणि कशी होते? पदभार कसा सोडावा? राजीनामा अमलात कधी येतो? याची अक्कल नसेल तर किमान माहिती घेऊन राजीनामे द्यावेत उगाच तारे तोडू नयेत. बिनडोकपणे मनात येईल तेंव्हा राजीनामा देऊ नये.

अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी त्यांच्या पदाचा अवेळी राजीनामा देऊन संस्थेची गोची करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. राजीनामा निबंधकांना पोष्टने पाठवणे, समितीला ईमेल करणे, किंवा राजीनामा पाठवून देऊन पदाच्या जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवणे, कामकाजात भाग घ्यायचा बंद करणे, चेक वर सही नाकारणे. ही सर्व बालिश कृत्य आहेत. हे करून काय आनंद मिळतो, त्यांनाच माहित.

सोसायटी पदाधिकारी राजीनामा देण्याचे नियम आणि कायदे!!!

पदाचा राजीनामा देण्याची पद्धत काय असते ?
१. अध्यक्ष सचिवांकडे राजीनामा देऊ शकतो,
२. सचिव किंवा खजिनदार अध्यक्षांकडे राजीनामा देऊ शकतात.

राजीनामा अमलात कधी येतो?
१. राजीनामा स्वीकारला गेला पाहिजे आणि
२. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी त्यांच्या कामाचा ताबा, नवीन निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना रीतसर दिल्यानंतरच राजीनामा अमलात येतो.
म्हणजेच नवीन पदाधिकारी कारभार स्वीकारपर्यंत तुम्हाला कामकाज बंद करता येत नाही. तसेच संस्थेची अडवणूक सुद्धा करता येत नाही.

राजीनामा कधी स्वीकारला जातो?
१. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यावर सोपवलेली कामे अद्ययावत पूर्ण केली असली पाहिजेत
२. त्यांचे ताब्यातील संस्थेची सर्व कागदपत्र, दप्तर, मालमत्ता समितीच्या समोर सादर केली पाहिजे.
३. उक्त बाबींची पूर्तता झाल्यावरच समिती राजीनामा स्वीकारू शकते.

काही मिस्टर बीन राजीनामापत्र पाठवलं कि जबाबदारीतून मुक्त झाल्याच्या अविर्भावात उजळ माथ्याने फिरतात.
काही दीडशहाणे परस्पर निबंधकांना राजीनामा पाठवून देतात. आणि बुद्धिमत्तेचा प्रदर्शन करतात.

त्यामुळे राजीनामा देताना भान ठेवलं पाहिजेच.
मुळात पदाची जबाबदारी स्वीकारताना सुद्धा चित्त थाऱ्यावर ठेऊन पद स्वीकारले पाहिजे. पदाला न्याय देता येईल का याचा विचार करून पद स्वीकारलं पाहिजे. उगाच मोठेपणान मिरवता यावं, चार लोकांनी महत्व द्यावं म्हणून पद स्वीकारू नये.

पदाच महात्म्य, आदर, आब राहील असच काम केलं पाहिजे. संस्था पदाधिकाऱ्यांच्या मालकीची नसते त्याच प्रमाणे पदाधिकारी हा सभासदांचा नोकर नसतो. हेही लक्षात घेतलं पाहिजे.

गृहनिर्माण संस्थेचा पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हा नित्याने अनुभवयाला मिळत आहेत, त्यातून मनोरंजनच होत आहे.काही संस्थांमध्ये पदाधिकारी होण्यास कोणीही तयार नसत, त्यामुळे नाईलाजाने सेवानिवृत्त असलेल्या सदस्यांच्या वाट्याला अध्यक्ष किंवा सचिव पद येत.काही संस्थांमध्ये पदाधिकारी बनण्यासाठीची हौस असणारे अनेक असतात. असे हौशी पदाधिकारी बनतात पदावर आलेल्या व्यक्तींच्या स्वभावानुरूप, सोईनुसार संस्थेचं कामकाज चालत असत. शब्दोशब्दी स्वतःचा अहंकार दुखावला जात असणाऱ्यांसाठी पद नाहीतच. पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून सेवाभावी वृत्तीने काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनीची पदावर यावं. अशांनाच पदावर विराजमान करावं.पदाधिकारी जेंव्हा त्या पदाच आब राखत नाही जेंव्हा तो कारकून म्हणून काम करायला सुरुवात करतो.

संस्थेचं कामकाज सहकार अधिनियम, नियम आणि उपविधी यांचे प्रमाणे चालवायचे असेल तर स्वतःच्या सोईनुसार काम न करता योग्य मार्गदर्शक नेमला पाहिजे, काम करणारी यंत्रणा उभारली पाहिजे. तरच काम सुरळीत चालू शकत. काम करायला मजा येऊ शकते.

यापुढे राजीनामा देताना विचारपूर्वक द्या!

आपला बंधु,
युवराज (दादासाहेब) पवार
अध्यक्ष,महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, पुणे शाखा.
९८९०७१२२१७

Refer the Blog related to Society Commitee Responsibility here:

12 COMMENTS

  1. Sir,
    I am secretary in one of the society and due to change in job profile and work load, is not getting time to do work on time for society. I don’t want to become stoppage for society work, as I need to travel on multiple locations of company now accross India.

  2. Dear Sir,

    Pl guide me..
    How to resign post of chairman of co-operative housing society (Temparory commitee). due to job location change.

    Thanks & Regard,
    Mahadev Pote

  3. Mala sarvjanik मंडळाचा खजिनदार पदाचा राजीनामा द्यायचा आहे तरी मला कसा द्यायचा तो नमुना द्या साहेब

  4. मला सोसायटीच्या खजिनदार पदाचा घरगुती कारणांमुळे मध्येच राजीनामा द्यायचा आहे मागदर्शन करावे हि विनंती

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  5. आमच्या मुंबईयेथील सोसायटी मध्ये काही कमिटी मेम्बर्स राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत ,कमिटी मेम्बर्स नी राजीनामा दिला तर त्या जागी नविन कमिटी मेंबर घेऊ शकतो का ?

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  6. भाडेकरू संघ आहे. ते सुद्धा रजिस्टर नाही. त्याला सुद्धा हे नियम लागू आहेत का?
    तसेच आमची नेमणूक रीतसर मार्गाने झालेली नाही. अगोदरच्या अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी राजीनामा दिला काम करायला कोणी तयार नाही.म्हणून आम्ही कोणतेही हिशोब पेपर्स न घेता काम पाहिले.पागडीची इमारतीच्या मधिल रहिवाशी स्वतःचे नोकर समजतात.

  7. कमिट टी मेंबर अध्यक्ष ला नियमबाह्य कामे करयला सांगत आहे पुनर्वीकसा साठी बिल्डिंग जात आहे परंतू ते दोन कमिटि मेंबर बिल्डर च्या तालावर नाचत आहेत आणि इतर पन कमिटि secretary खजिनदार ते सांगतात तेथे सही करतात म्हणूण चेअरमन ने आजारी चे कारन देवून राजीनामा दिला कोणी ककोणाची दुष्मनी घेत नाही तुमचे सहकार खाते काही मदत करित नाही सभासद कोणीच पुढे येत नाहीत.सर्व चेअरमन वर जबाबदारी टाकतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here