तुम्ही घरात भाडेकरू ठेवला असेल तर हे नक्की वाचा!

3
5448

अनेक सदनिका धारक, दुकानदार भाडेकरू ठेऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवतात. भाडेकरू ठेवल्यावर भाडेकरूची माहिती शेवटीदिलेल्या लिंक वरील फॉर्म भरून जवळील पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. तुम्ही पोलिसांना भाडेकरूची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास तुमच्यावर भारतीय दंड संहितेनुसार यथोचित कारवाई होऊ शकते.

गृहनिर्माण संस्थांनी, सर्व सदनिका धारकांना, भाडेकरूची माहिती खालील फॉर्म भरून जवळील पोलीस ठाण्यात देण्याबाबत बजावले पाहिजे, सभासद अतिशहाणा असेल तर  त्या सभासदाच्या नादानपणाबात सरळ पोलीस ठाण्यात कळवल पाहिजे, पोलीस त्यांचे कर्तव्य बजावतील आणि कायदेशीर कारवाई करतील.

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाडेकरूची माहिती पोलीसाना देणे, अतिशय गरजेचे आहे. पोलिसांना माहिती दिल्यास भाडेकरूवर दबाव राहतो, त्यांच्याकडून गैरकृत्य घडण्याच्या शक्यता अतिशय कमी होतात. तसेच ज्याने सदनिका, दुकान भाड्याने दिले आहे तो निश्चिंत होऊ शकतो. बँचलर जो धिंगाणा करतात त्याला सुद्धा आला बसेल.अतिरेकी अथवा गुंड प्रवृतीचे लोक पोलीस पडताळणी म्हंटल्यावर भाड्याने राहणार नाहीत.

अधिकाधिक लोकांपर्यंत हा फॉर्म  Tenant_info_to_police_by_owner पोचवा, हि विनंती .

 

3 COMMENTS

  1. On what part of d monthly maitenanace bill ie (maintenace amt + car parking + sinking fund + other micscellnius amt excluding Property bill amt d a member who has rented his flat on L/L non occupency pays his Non occupency charges of 10%
    to his scty?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here