दुय्यम निबंधकाना बळी पडू नका

1
7340

प्रत्येक नागरिकाला दुय्यम निबंधक कार्यालयात कधी ना कधी जावं लागतंच।
पुणे शहर व हवेलीमधे तब्बल 27 दुय्यम निबंधक कार्यालय आहेत।
या दुय्यम निबंधकांनी नोंदणी अधिनियम १९०८, महाराष्ट्र नोंदणी नियम १९६० अन्वये कर्तव्य बजावणे अनिवार्य आहे।

दुय्यम निबंधका संबंधीचे नियम
दस्त नोंदणी साठी जमा केला असता अधिकाऱ्यांना  नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ५२, महाराष्ट्र नोंदणी नियम १९६० चे नियम ३९ तसेच कलम ३२ चे पालन करण्याचा आग्रह धरा , दस्त नोंदणीस नकार देत असतील तर तर कलम ७१ नुसार कार्यवाही करण्यास सांगा, आणि चमत्कार पहा!

संपूर्ण कामकाज ऑनलाईन झाले आहे। नियम स्पष्ट आहेत। तरीही दस्त नोंदणीसाठी गेले असता दस्तावर केवळ हाताने क्रमांक टाकला जातो, नोंदणी अधिकारी, नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ५२, महाराष्ट्र नोंदणी नियम १९६० चे नियम ३९ चे पालन करत नाहीत। तसेच कलम ३२ चे पालन न करता काही दुय्यम निबंधक फाजील चौकशी करत असतात। अक्कलचे तारे तोडत न्यायधीशाच्या भूमिकेत जातात। अनावश्यक चौकश्या करून पाद्री कारण पुढं करून दस्त नोंदणीस तोंडी नकार देतात. दस्त नोंदणीस नकार देताना कलम ७१ चे पालन करणे बंधनकारक आहे। कायद्या फाटा देतात, आणि दस्त नोंदणीसाठी आलेल्याना ब्रम्हज्ञान शिकवतात।हा सर्व उपद्व्याप पैसे उकळण्यासाठीच केला जातो। दस्त नोंदणी करणे हा एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असलेले काही वकीलानी या अधिकाऱ्यांना अर्थपूर्ण चटक लावलेली आहे। त्यामुळे कधीकाळी दस्त नोंदवण्यास गेलेल्या वकिलांना आणि नागरिकांना हकनाक नाक घासत, केविलवाणे चेहरे करून अपराध्यासारख या दुय्यम निबंधकाच्या समोर उभं रहावं लागत, त्यांच्या तालावर नाचाव लागते, त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो। विशेषतः काही बिल्डरांचे तज्ञ जास्त भ्रष्ट आहेत। बिल्डरांचे दस्त लवकर नोंद व्हावेत, त्यासाठी आधीच सेटिंग करून ठेवणे, हे त्यांचे आद्य कर्तव्य समजून इमाने इतबारे सेटिंग करतात। दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात ज्या वकिलांची दुकान आहेत, त्यातील काहीचे साटेलोटे या दुय्यम निबंधकासोबत असते!

या दुय्यम निबंधकाचे अधिकार काय? रुबाब काय? अस वागतात जसे त्यांना वडिलांकडून वडिलोपार्जित जहागिरी मिळाल आहे? गुरगुरत बोलत बघण्याचा गुण त्या खुर्चीमुळे येत असावा, खाजगी कंपनीत जे आदरआतिथ्य शिकवलं जातं तस यांच्या खुर्चीप्रतिष्ठापणाच्या वेळेला शिकवलं पाहिजे। म्हणायला सेवा नियम लागू आहेत। लाज नावाचं (कर्म) शब्द यांच्या शब्दकोषात नसावाच।

हा माज मोडलाच पाहिजे। त्यांच्या मगृरीवर प्रहार केलाच पाहिजे।

 

एकही रुपयांचा अतिरिक्त बोजा न घेता, दस्त अधिनियमातील तरतुदीनुसार व्हावेत, यासाठी हा ब्लॉग प्रपंच।

*युवराज(दादासाहेब) पवार*
9890712217

Please read recommended blog here:

1 COMMENT

  1. मा महोदय ,राज्य आयोगात केस सुनावणीस विलंब होत असल्यास काय करावे कृपया मेलवर मार्गदर्शन करावे ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here