#संस्था #नोंदणी करताना #बाजारात उपलब्ध असलेले आदर्श #उपविधी जसेच्या तसे #न #स्वीकारता संस्थेचे त्यांचे स्वतःचे उपविधी बनवले पाहिजे. आवश्यकता वाटेल तेंव्हा उपविधी सुधारणा करून घ्या व पुढे येणाऱ्या अनेक समस्यांना सुरुवातीसच पूर्णविराम देण्यास मदत होते.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०
कलम २(५) उपविधी व्याख्या.
#उपविधी :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये नोंदवलेले व त्या वेळी अमलात असलेले उपविधी असा होतो आणि तीत, अशा उपविधीच्या नोंदवलेल्या सुधारणांचा समावेश होतो.
#उपविधी म्हणजे :- संस्थेची अंतर्गत कारभार, देखभाल, व्यवस्था सुरळीत/नीट चालवण्यासाठी केलेली नियमावली.
#उपविधी #सुधारणा म्हणजे :- उपविधीतील कलम अथवा कोणत्याही कलमातील शब्द बदलणे अथवा शब्द रचना बदलणे, तसेच नवीन शब्द समाविष्ट करणे अथवा शब्द गाळणे होय.
#टिपा व #सूचना
#१. उपविधी अमलबजावणीचा अथवा श्रेष्ठत्वाचा प्रश्न/वाद असल्यास, सर्वात आधी महत्व हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ व त्यानंतर उपविधीला महत्व दिले जाते.
#२. उपविधी मंजूर करण्याचा, रद्द करण्याचा, मागे घेण्याचा तसेच उपविधी सुधारणा करण्याबाबत निदेश देण्याचा अधिकार (म.स.स.अ., कलम १४) निबंधकांना आहे.
#३. संस्थेने उपविधी सुधारणा, सर्वसाधारण सभेत ठराव संमत करून त्या ठरावाची प्रत निबंधक यांचे कडून नोंदणी (म.स.स.अ., कलम १३(१)) करून घेई पर्यंत विधीग्राह्य नसतात. निबंधक यांनी उपविधी सुधारणा नोंदणी २ महिन्याच्या कालवधीत निकाली काढणे आवश्यक आहे. संस्थेच्या उद्दिष्टाना बाधा पोहचवता उपविधी मंजूर करण्याचा, उपविधी रद्द करणे किंवा मागे घेण्याचा अधिकार निबंधकांना आहे.
४. उपविधी कोणत्या बाबींच्या संदर्भात करता येतात- संस्थेला किंवा निबंधकाला कोणत्या बाबींच्या संदर्भात उपविधी करता येतात त्या बाबी नियम ८ मध्ये स्पष्ट केल्या आहेत . त्या पुढीलप्रमाणे आहेत :
१) संस्थेचे नाव , पत्ता , संस्थेचे कार्यक्षेत्र;
२) संस्थेची उद्दिष्टे;
३) निधी उभारणी व निधीचा विनियोग, हिशोब व कागदपत्रे ठेवण्याची पध्दती;
४) सदस्य म्हणून प्रवेश देण्यासाठीच्या अटी, शर्ती व पात्रता ;
५) क्रियाशील सदस्य, सभासद, सहयोगी सभासद नाममात्र सदस्य याचे हक्क , अधिकार ,कर्तव्ये व जबाबदाऱ्या;
६) थकबाकी वसुली बाबत दंड व नियमावली ;
७) सर्वसाधारण सभा व समितीच्या सभा बाबत नियमावली
८) सदस्याला काढून टाकण्याविषयीची कार्यपद्धती;
९) उपविधीत बदल आणि ते रद्द करण्याची रीत;
१०) समितीच्या सदस्याची, अधिकाऱ्याची निवडणुकीद्वारे किंवा इतर प्रकारे नेमणूक करण्याची व त्यांना पदावरून काढून टाकण्याची पध्दती, त्याचे अधिकार व कर्तव्ये;
११) कर्मचारी भरती पध्दती;
१२) समितीची स्थापना करणे, आणि संस्थेच्या इतर माद्लांची अधिनियम, नियम व उपविधी अन्वये स्थापना करणे ;
१३) वार्षिक आणि विशेष साधारण सभा बोलाविण्याची पद्धती;
१४) सभासद व समिती सदस्यांना प्रशिक्षण व इतर
लक्ष द्या :- सदर माहितीवर विसंबून राहू नये, कायदे तज्ञाचा सल्ला घ्यावा. सदर माहितीचा उपयोग कोणत्याही कार्य, केस करण्यासाठी करणे योग्य नाही.
युवराज (दादासाहेब) पवार
अध्यक्ष
महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, पुणे शाखा
९८९०७१२२१७
[…] click here to download. […]
When the Society has approved the resolutions in AGM unanimously and the minutes have been shared with the Registrar’s office & no comments/ remarks are received from registrar- then can the society take it that all the resolutions passed in the AGM are in order and society can move ahead by implementing the same .
Can the society take this as approval to amend the Bye laws accordingly