हाउसिंग सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभे विषयी माहिती असावे, असे ठळक मुद्दे.

22
30198
Read in English

 

वार्षिक सर्वसाधारण सभा घेताना तारांकित माहिती।

  • ३१ मार्च नंतर ४ महिन्यात म्हणजेच ३१ जुलै अखेर पर्यंत लेखापरीक्षण पूर्ण केले पाहिजे.
  • ३० सप्टेंबर पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे.
  • समितीने ३० सप्टेंबर पूर्वी घेण्यास कसूर केल्यास सभा बोलवण्याचा अधिकार निबंधक यांचा असतो.
  • समितीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची दिनांक, वेळ, जागा आणि सभेचे कामकाज निश्चित केले पाहिजे.
  • वार्षिक सभा घेण्याचे ठरल्यावर सभेची नोटीस सक्षम हाती द्यावी किंवा पोष्टाने पाठवावी किंवा इमेल द्वारे पाठवावी. तसेच संस्थेच्या सूचना फलकावर लावावी.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठळक मुद्दे
  • वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्वाधिकार असतात.
  • समितीचा अध्यक्ष हा सभेचा अध्यक्ष असतो परंतु तो गैरहजरराहिला किंवा सभाध्यक्षाचे काम करण्यास राजी नसेल तर हजर सभासदांपैकी एकाला सभाध्यक्ष म्हणून निवडता येते.
  • सर्वसाधारण सभेला एकूण सदस्यांच्या २/३ सदस्य किंवा २० सभासद यापैकी जी संख्या कमी असेल तितके सभासद हजर राहिल्यास गणपूर्ती होते.
  • गणपूर्ती न झाल्यास सभा तहकूब करून नोटीस मध्ये लिहिले असल्यास त्याच दिवशी पुन्हा भरवता येते.
  • सर्वसाधारण सभेला हजर राहणे, हा सदस्याचा हक्क आहे.
  • सहयोगी सदस्यास एखाद्या सदस्यांच्या लेखी पूर्व संमतीने सभेला उपस्थित राहता येईल व मतदान करता येते
  • सह सदस्यांच्या बाबतीत भाग दाखल्यावरील पहिले नाव असणारा सदस्य अनुपस्थित राहिल्यास दुसऱ्या क्रमांकावरील सह सदस्य सभेस उपस्थित राहू शकतो, मतदान करू शकतो.
  • कायद्याच्या कक्षेत सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेले निर्णय सर्व सभासदांवर बंधनकारक असतात. सभेला उपस्थित न राहता. “मी सभेला नव्हतो, मला निर्णय मान्य नाही” असं म्हणणारे अर्धवट किंवा बालिश असतात.
  • संस्थेच्या अधिकार कक्षेत राहून संचालकाने त्यांच्या अधिकाराबाहेर संस्थेचे व्यवहार केले आणि त्यास सर्वसाधारण सभा मंजुरी देऊ शकते.

वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर खालील बाबी ठेवाव्या,

  • मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचणे व कार्यवाहीची नोंद घेणे
  • उत्पन्न खर्च व मागील वर्षाचे ताळेबंद हिशोबपत्रक स्वीकारणे
  • लेखापरीक्षण अहवाल विचारात घेणे
  • दोषदुरुस्ती अहवाल (असल्यास) त्यावरील कृती अहवाल विचारात घेणे
  • पुढील वर्षाचे अंदाजपत्रक विचारार्थ ठेवणे
  • शासकीय यंत्रणेकडून आलेल्या पत्रावर विचार करणे
  • निवडणुकीबाबत आवश्यक चर्चा व निर्णय
  • कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व विषय संपल्यावर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करण
  • पुढील वर्षासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे.
  • संस्थेच्या अधिकार कक्षेत राहून संचालकाने त्यांच्या अधिकाराबाहेर संस्थेचे व्यवहार केले आणि त्यास सर्वसाधारण सभा मंजुरी देऊ शकते.
  • निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे
  • ७/१२ किंवा प्रॉपर्टी कार्ड संस्थेच्या नावावर करणे. अभिहस्तांतरण करणे
    वैगरे वैगरे

सभा झाल्यावर

  • सभेचे इतिवृत्त १५ दिवसात तयार करून सभासदांना पाठवले पाहिजे, सभासदाच्या प्रतिक्रिया आल्यास त्या विचारात घेऊन अंतिम इतिवृत्त तयार केले पाहिजे. इतिवृत्त मसुदा ३ महिन्याच्या आत पूर्ण केला पाहिजे. अंतिम मसुदा इतिवृत्त पुस्तकात नमूद करून घेतला पाहिजे.
  • सर्वसाधारण सभेचा ठराव संमत झाल्यापासून ६ महिन्याची मुदत संपल्याशिवाय रद्द करण्याचा ठराव करता येत नाही.
  • सर्वसाधारण सभा किंवा व्यवस्थापन समितीचे ठरावावरून वाद निर्माण झाल्यास सहकारी न्यायलयात दाद मागावी लागते.
  • लेखापरीक्षणात अफरातफर, लबाडी, समितीच्या निष्काळजीपणामुळे संस्थेचे नुकसान झाले असेल तर निबंधक संबधीताकडून नुकसान भरपाई मागू शकतात
  • लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा निबंधकाना सादर करण्यास कसूर केल्यास समितीला दोषी धरून कारवाई केली जाते
  • वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास कसूर करणाऱ्या पदाधिकाऱ्याला ५ वर्षासाठी निवडला जाण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते.

22 COMMENTS

  1. After AGM of society, secretary not preparing minutes of AGM. what committee members & what action members can take. Please advise.

  2. सहयोगी सदस्य मूळ मालकाच्या लेखी अनुमतीने सर्वसाधारण सभेत भाग घेऊ शकतो हा स्टँडिंग कायदा असताना सोसायटी समिती तो सोसायटीत अर्ज करून सदस्य झाला नाही असे सांगून सभेत भाग घ्यायला देत नाही,तसे सोसायटीला अधिकार आहेत का सोसायटीने तशी त्यांच्या घटनेत प्रोविजन करने बंधनकारक असते

    • आम्हाला तुमच्या प्रश्नाच निरसन करण्यास आवडेल, पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 9175733957

  3. Nice information sir thank u sir
    गृहनिर्माण सोसायट्या सर्व साधारण सभेत लेखापरीक्षण अहवाल नामंजूर केला किंवा फेटाळला आहे या बाबतीत काय कायदेविषयक तरतूद आहे व काय कार्यवाही होईल या बाबतीत माहिती द्यावी हि विनंती

  4. I have not checked in here for some time as I thought it was getting boring, but the last several posts are good quality so I guess I will add you back to my daily bloglist. You deserve it my friend 🙂

  5. We’re a gaggle of volunteers and starting a brand new scheme in our community. Your web site provided us with helpful information to paintings on. You’ve performed an impressive job and our whole group will likely be thankful to you.

  6. महोदय ,ग्राहक न्यायालयात केस चालु असताना एखाद्या सभासदाच्या फ्लॅट लिकेजमुळे दुसऱ्या सभासदास त्रास होत असल्यास त्या फ्लॅटधारकास कोर्ट निर्नयापुर्वी आपणांस दुरुस्ती करवुन घेण्याची सूचना/आदेश देउ शकतो का ? तसेच जर केसला ७/८ वर्षे होउनही आजुनही राज्य आयोग अपील सुनावणीस घेतले जात नसेल तर राज्य आयोगास आपण कशा प्रकारे तक्रार करावी व सुनावणीची विनंती करावी .कृपया इमेलवर मार्गदर्शन करावे .

  7. Pls.reply above on agastinbc.14@gmail.com .एखाद्या सोसायटीत वरच्या फ्लॅटच्या टेरेस मुळे किंवा लिकेजमुळे त्या खालील फ्लॅट लिकेज असेल तर सोसायटी मुळ मालकाला (वरच्या फ्लॅट मालकाला) अशी दुरुस्ती करन्यासंबधी आदेश देउ शकते का ?

    २) जर स्टेट कमिशनपुढे सोसायटी निकृष्ट बांधकाम याबाबत अपीलात केस असेल मात्र गेल्या ७/८ वर्षे हो उनही केस हिअरींगला येत नसेल तर काय करावे याविषयी कोनाकडे समस्या मांडावी .यासंदर्भात सोसायटी निर्णय घेण्यासाठी agastinbc.14@gmail.com यावर माहीती द्यावी ही विनंती .

  8. साधना रेसीडेंसी गृहरचना संस्था मर्यां लोणावळा.

    Pls.reply above on agastinbc.14@gmail.com .एखाद्या सोसायटीत वरच्या फ्लॅटच्या टेरेस मुळे किंवा लिकेजमुळे त्या खालील फ्लॅट लिकेज असेल तर सोसायटी मुळ मालकाला (वरच्या फ्लॅट मालकाला) अशी दुरुस्ती करन्यासंबधी आदेश देउ शकते का ?

    २) जर स्टेट कमिशनपुढे सोसायटी निकृष्ट बांधकाम याबाबत अपीलात केस असेल मात्र गेल्या ७/८ वर्षे हो उनही केस हिअरींगला येत नसेल तर काय करावे याविषयी कोनाकडे समस्या मांडावी .यासंदर्भात सोसायटी निर्णय घेण्यासाठी agastinbc.14@gmail.com यावर माहीती द्यावी ही विनंती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here