सोसायटीने सातबारा/प्रॉपर्टी कार्ड सर्वप्रथम नावावर करून घेतला पाहिजे

1
3859

प्रत्येक घर खरेदी केलेल्या खरेदीदाराला अस वाटत असत कि घर किंवा दुकान खरेदी व्यवहार पूर्ण झाला म्हणजे त्यांची जबाबदारी संपली. खर तर त्या नंतर जबाबदारी वाढते. जोवर तुमच्या जमिनीचा सातबारा/प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावावर होत नाही तोवर तुम्ही खऱ्या अर्थाने मालक होत नाही. सातबारा नावावर करण्याचे दोन मार्ग आहेत. १) बिल्डरने स्वखुशीने करून देणे २) बिल्डर तयार नसेल तर शासनाकडून करून घेणे
सोसायटी नोंद झाल्यानंतर ४ महिन्याच्या आत बिल्डरने स्वखुशीने जमीन सोसायटीच्या नावावर करून दिला पाहिजे. परंतु स्वार्थापोटी काही बिल्डर टाळाटाळ करतात. बिल्डरांना वाढीव FSI वर हक्क सांगून फायदा मिळवायचा असतो किंवा FSI अथवा TDR विकत घेऊन वाढीव बांधकाम करायचे असते. जाहिरात किंवा टॉवर उभारून अधिकचे उत्पन्न कमवायचे असते तसेच इतर कारणांमुळे बिल्डर सातबारा सोसायटीच्या नावावर करून देण्यास उत्सुक नसतात.जर बिल्डर अभीहस्तांतरण करून द्यायला तयार नसेल सोसायटीने थोडा खर्च करून मानीव अभीहस्तांतरण करून सातबारा नावावर करून घेतला पाहिजे, त्यासाठी बिल्डरची आवश्यकता नसते. जिल्हा उपनिबंधक यांना अर्ज करावा लागतो, त्यांचा आदेश घेऊन नंतर दुय्यम निबंधक यांच्याकडे अभिहस्तातरण दस्त नोंद करावा लागतो, दस्त नोंद झाल्यावर सातबारावर सोसायटीचे नाव लावण्यासाठी तलाठ्याकडेकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर सोसायटीचे नाव सातबारावर लावले जाते

सातबारा/प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावावर करण्यासाठी प्रामुख्याने खालील कागदपत्र लागतात.

१. विहित नमुन्यातील अर्ज
२. सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र
३. सर्व सभासदांचे सूची दोन (Index II)
४. कोणाही एका खरेदीदाराचे खरेदीखत
५. भोगवटा दाखला/नियामितीकरण दाखला/ स्वयंघोषणापत्र
६. चालू ७/१२ उतारा
७. FSI शिल्लक बाबत दाखला
८. विक्री न केलेल्या गाळ्यांचे वीजबिल अथवा कर पावती
९. मंजूर बांधकाम आराखडा

What is 7/12 extract or Property Card ? Click here

टीप:- केवळ माहितीसाठी कायदेशीर कार्यवाही साठी तज्ञांचा सल्ला घ्यावा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here