महारेरा प्राधिकरणाने 9 मार्च 2018 रोजी दिलेल्या एका निकालांमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की जर खरेदीदारांनी घराचा ताबा (possession) घेतले असेल तर त्यांची तक्रार महारेरा प्राधिकरण ऐकणार नाही. सोबत जोडलेला निकाल पहा.
घर खरेदी नंतर खरेदीदार घरात राहायला जायला उतावीळ होतात. त्यांचा उतावीळपणा त्यांच्यासाठी खूप घातक आहे
खरतर जोपर्यंत तुम्हाला भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राहायला जाणं हे कायद्याला धरून नाही. भोगवटा प्रमाणपत्राशिवाय तुम्ही राहायला गेला तर स्वतःचे नुकसान करून घेतात मला तुमची फसवणूक करण्याची तसेच काम अपूर्ण ठेवण्याची बिल्डरला संधी देत असतात, ठरलेल्या करारानुसार जर तुम्हाला घराचा ताबा मिळाला नाही तर तुम्ही महारेरा प्राधिकरणाकडे तक्रार करा योग्य न्याय मिळेल, घरात राहायला जाण्याची घाई करण्यापेक्षा व भाड्याने घर घ्या त्यात रहा हे सर्व भाडं बिल्डरकडून वसूल करता येईल परंतु काम पूर्ण झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ताबा घेऊ नका.
Recommended Article For You :बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करताना काय काळजी घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
युवराज (दादासाहेब) पवार
अध्यक्ष,
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन, पुणे शाखा
9890712217
[…] भोगवटा प्रमाणपत्र […]