बिल्डरने तुम्हालाही गंडवल असेल!
बिल्डरकडून फ्लॅटधारकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असते ती मुख्यत्वे कार्पेट एरिया, पार्किंग, सोसायटी नोंदणी खर्च, सामाईक सोई (कॉमन अमेनिटीज), वीज जोडणी, मेंटेनन्स रक्कम वगैरे वगैरे,
आज आपण कार्पेट एरियाबाबत होणारी फसवणूक समजून घेऊ: आपण सदनिका खरेदी करताना रेरा पूर्वी मोफा कायद्याअंतर्गत आपले करार नोंद होत असत, मोफा कायद्यातील तरतुदीनुसार कार्पेटएरियानुसारच सदनिकांची विक्री केली जाऊ शकते. अनेक बिल्डरांनी कार्पेट एरियामध्येच मोठी फसवणूक केलेली आहे.
इमारत बांधल्यावर प्रत्यक्षात वापराचा कार्पेट एरिया हा मंजूर बांधकाम आराखड्या इतकाच असायला पाहिजे व तितकाच एरिया खरेदीखत / अग्रीमेंट मध्ये उल्लेख केला पाहिजे. परंतु वास्तव भयाण आहे. अधिक धन, पैसा कमवण्यासाठी या सातजन्माच्या भिकाऱ्या बिल्डरांनी राजरोसपणे अधिक कार्पेट एरियाचे दस्त करून दिले आहेत. म्हणजे कार्पेट एरिया ५० चौ.मी. असेल तर ५५/६० चौ. मी. दाखवणे, त्यावर आणखी लोडिंगचा भार टाकणे, त्यातून खरेदीदारांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे.
सदनिका घेताना तुम्ही बिल्डरवर डोळे झाकून विश्वास ठेवला असेल, बिल्डरने जे करारपत्र / अग्रीमेंट दिले, त्यावर उतावळे होऊन सह्या केल्या असतील. वकिलांकडून करारपत्र तपासून घेतले नसेल, कार्पेट एरिया बाबत आर्किटेक्टचे मार्गदर्शन घेतले नसेल, तर तुम्ही नक्कीच गंडवले गेले असणार.
जागे व्हा, आर्किटेकट आणि बिल्डरला कार्पेट एरियाचा दाखला मागा. जागेची मोजणी करून मागा. तुमचा तो हक्क आहे. त्यांनी सहकार्य न केल्यास स्वतः थोडे कष्ट घ्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुन्हा दाखल करा. पैसे परत मागा. इतरांना जागृत करा, एकजूट व्हा, लढा उभारा, न्याय मिळेपर्यंत आम्ही तुम्हाला साथ देऊ. २०१९ हे साल नटवरलाल बिल्डरांना धडा शिकवण्याच आहे.
संपर्क करा:
युवराज(दादासाहेब) पवार
अध्यक्ष,
महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, पुणे शाखा
९८९०७१२२१७
बिल्डरने तुम्हालाही गंडवल असेल!
Chat Conversation End